SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

ना मैदा, ना रवा... फक्त 2 बटाट्यांपासून तयार करा कुरकुरीत आणि खुसखुशीत पापडी!

आज तुम्हाला या लेखामध्ये पापडीची रेसिपी खास आहे, या पापडीची कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड्या मैदा किंवा रव्याशिवाय बनवल्या जातात ही रेसिपी सविस्तर वाचा.

Written By Shubhangi Mere Edited By Shubhangi Mere
Published: Oct 03, 2026, 09:57 PM IST | Updated: Oct 03, 2026, 10:17 PM IST
Join

सकाळी किंवा संध्याकाळी चहासोबत खायला अनेकांना आवडते आणि त्यामुळे मग अशावेळी घरी अनेकदा काहीच वेळेवर खायला नसते. अनेकजणांना चहासोबत नमकीन, मठरी, बिस्किटे आणि चिप्स यांसारखे बाजारात मिळणारे पदार्थ विकत आणण्याऐवजी घरी काहीतरी बनवणे अधिक चांगले असते. आज तुम्हाला या लेखामध्ये पापडीची रेसिपी खास आहे, या पापडीची कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड्या मैदा किंवा रव्याशिवाय बनवल्या जातात. त्यांना तासन्तास लाटण्याचा त्रास नाही; फक्त एका सोप्या युक्तीने तुम्ही काही मिनिटांत भरपूर पापड्या बनवू शकता.

कुरकुरीत पापडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

कृती

कुरकुरीत पापडी तयार करण्यासाठी सर्वात आधी दोन उकडलेले बटाटे घेऊन ते चांगले मॅश करा. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची खात्री करा. ते एका मोठ्या भांड्यात काढा. त्यात दिलेल्या प्रमाणात तांदळाचे पीठ आणि थोडे बेसन घाला. अख्खे जिरे, हाताने कुटलेला ओवा आणि चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर घाला. पापडीमध्ये कसुरी मेथीचा सुगंध खूप छान लागतो. तुम्ही ती कुस्करूनही घालू शकता. याव्यतिरिक्त, पांढरे तीळ, कलौंजी, चिमूटभर हिंग, चाट मसाला, मीठ आणि एक चमचा तेल घालून पीठ चांगले मळून घ्या. पाणी घालण्याची गरज नाही. बटाट्यातील ओलावा वापरून पापडीचे पीठ तयार करा.

त्यानंतर पिठाचे छोटे गोळे तयार करा आणि एक बटर पेपर किंवा फॅाइल घेऊन त्याला तेल लावा. त्यानंतर सर्व गोळे ठेवून हाताने हलकेच दाबून घ्या आणि थोडे दूर ठेवा म्हणजेच पापड्या बनवताना ते एकमेकांना चिकटणार नाहीत. त्यानंतर दुसरा बटर पेपर आणि फॉइल ठेवून वाटीच्या साहाय्याने हलकेच दाबून घ्या आणि गोल फिरवून पापड्यांचा आकार द्या. शेवटी, त्या फुगू नयेत म्हणून काट्याच्या किंवा सुरीच्या साहाय्याने त्यांना लहान छिद्रे पाडा. कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर, मंद ते मध्यम आचेवर पापड्या तेलात सोडा. त्या सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यावर लगेच तेलातून काढा.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES