नवरात्री सुरु होणार आहेत आणि त्यामुळे यावेळी देवी शैलपुत्रीची पुजा केली जाते. देवी शैलपुत्री हे देवी दुर्गेचे पहिले रूप आहे. असे मानले जाते की देवी शैलपुत्रीचा आवडता रंग पांढरा आहे, म्हणूनच तिच्या पूजेमध्ये पांढऱ्या वस्तूंचा समावेश केला जातो. या पूजेला फक्त पांढऱ्या रंगाच्या वस्तूच नाही तर पदार्थ देखील तयार केले जातात, आज या लेखामध्ये या पूजेला तयार केली जाणारी स्पेशल खीर कशी घरच्या घरी बनवायची यासंदर्भात तुम्हाला सांगणार आहोत.
देवी शैलपुत्रीची पूजा करत असाल, तर तुम्ही नैवेद्य म्हणून मखाना खीर बनवू शकता. ही खीर तुम्ही देवीला अर्पण करु शकतात त्याचबरोबर प्रसाद म्हणून देखील खाऊ शकतात. ज्यांचा यावेळी उपवास असतो तेदेखील या खीरचा त्यांच्या आहारामध्ये समावेश करु शकतात. ही खीर कशी बनवायची आणि अनोख्या पद्धतीने ही खीर कशी बनवायची यासंदर्भात तुम्हाला सांगणार आहोत.
सुकामेव्याची पावडर बनवण्यासाठी – अर्धा कप मखाना, 2 चमचे काजू, 2 चमचे बदाम
खीरसाठी – 4 कप दूध, 1/4 कप साखर, 1/2 कप वेलची पूड
भाजण्यासाठी – एक कप तूप, 2 चमचे काजू, 2 चमचे बदाम, 2 चमचे मनुका, एक कप मखाना
मखाना खीर तयार करण्यासाठी सर्वात आधी सुकामेव्याची पावडर बनवा. सुकामेव्याची पावडर तयार करण्यासाठी अर्धा कप मखाना, 2 मोठे चमचे काजू आणि 2 मोठे चमचे बदाम घाला. त्यानंतर सर्व मिश्रण बारीक वाटून बाजूला ठेवा. आता पातेले आचेवर ठेवा आणि त्यात 4 कप दूध घाला. गरम झालेल्या दुधामध्ये तयार केलेली सुकामेव्याची पावडर घालून एकत्र मिसळा. आता पातेल्यातील सर्व साहित्य चांगले ढवळा आणि दूध घट्ट होऊ लागेपर्यंत ढवळत राहा. पुढच्या टप्प्यात, पॅनमध्ये पाव कप तीनी घालून मिक्स करा.
दूध घट्ट आणि मलईदार होईपर्यंत दूध चांगले उकळू द्या. यानंतर, दुसऱ्या पॅनमध्ये एक चमचा तूप घालून त्यात 2 चमचे काजू, 2 चमचे बदाम, 2 चमचे मनुका आणि एक कप मखाना टाका आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या म्हणजेच त्याची चव आणखी वाढेल. आता सर्व भाजलेला सुका मेवा कढईत घाला आणि त्यावर अर्धा चमचा वेलची पूड टाका. सर्व व्यवस्थित मिसळून घ्या आणि गॅस बंद करा. तुमची स्वादिष्ट मखाना खीर तयार आहे. ही खीर शैलपुत्री देवीला अर्पण करता येते किंवा प्रसाद म्हणून खाता येते.