• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /कामाच्या धावपळीपासून घ्या ब्रेक; मन ताजंतवानं करणाऱ्या या स्लो ट्रॅव्हल डेस्टिनेशन्सना द्या भेट

कामाच्या धावपळीपासून घ्या ब्रेक; मन ताजंतवानं करणाऱ्या या स्लो ट्रॅव्हल डेस्टिनेशन्सना द्या भेट

'स्लो ट्रॅव्हल' म्हणजे धावपळीपासून दूर एखाद्या सुंदर ठिकाणी निवांत वेळ घालवायला कोणाला नाही आवडत. यासाठीच कामाच्या व्यापातून आणि धावपळीतून थोडा विसावा घ्या आणि अशा ठिकाणांचा शोध घेण्यासाठी निघा.

Written Bytejashree gaikwad
Published: Oct 07, 2026, 11:06 AM IST|Updated: Oct 07, 2026, 11:12 AM IST
joinshare
कामाच्या धावपळीपासून घ्या ब्रेक; मन ताजंतवानं करणाऱ्या या स्लो ट्रॅव्हल डेस्टिनेशन्सना द्या भेट
Image Credit: Best Slow Travel Destinations in India (Freepik)

About the Author

tejashree gaikwad

tejashree gaikwad

'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सततची कामाची धावपळ, डेडलाईन्स आणि शहरातील गोंधळ यामुळे मन आणि शरीर दोन्ही थकून जातं. अशावेळी सुट्टी म्हणजे आणखी काही ठिकाणं झटपट फिरून येणं नव्हे, तर काही दिवस निवांतपणे स्वतःसाठी जगणं असायला हवं. यासाठीच स्लो ट्रॅव्हल हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. स्लो ट्रॅव्हल म्हणजे एखाद्या ठिकाणी गेल्यावर जास्तीत जास्त पर्यटनस्थळं पाहण्याची घाई न करता, त्या जागेत काही दिवस निवांत राहणं, निसर्ग अनुभवणं, स्थानिक जीवनशैली समजून घेणं आणि तिथल्या संस्कृतीशी जोडून घेणं. अशा प्रवासामुळे शरीराला आराम मिळतोच, पण मनालाही एक प्रकारची शांतता मिळते. भारतामध्ये अशी अनेक सुंदर ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही शहराच्या गोंगाटापासून दूर काही दिवस अगदी निवांत घालवू शकता. स्थानिक जेवणाचा आस्वाद घेण्यापासून गावाकडचं साधं जीवन अनुभवण्यापर्यंतचा हा प्रवास तुम्हाला आतून रिचार्ज करून टाकेल. चला, अशाच काही स्लो ट्रॅव्हल डेस्टिनेशन्सची सफर करूया.

माजुली बेट, आसाम

ब्रह्मपुत्रा नदीच्या विस्तीर्ण पात्रात वसलेलं माजुली हे आसाममधील एक अनोखं आणि शांत ठिकाण आहे. गर्दीपासून दूर काही दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवायचे असतील, तर माजुलीचा नक्की विचार करा. इथल्या साध्या होमस्टेमध्ये राहून स्थानिक जीवन जवळून अनुभवता येतं. सत्र आणि मठांना भेट देताना आसामची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जाणून घेता येते. नदीकाठची शांतता, हिरवाई आणि साधी जीवनशैली यामुळे काही दिवसांतच या ठिकाणाशी एक वेगळं नातं निर्माण होतं.

तीर्थन व्हॅली, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेश म्हटलं की मनाली, शिमला किंवा कसोलसारखी लोकप्रिय ठिकाणं डोळ्यासमोर येतात. मात्र गर्दीपासून दूर जायचं असेल, तर तीर्थन व्हॅली हा अधिक निवांत पर्याय ठरू शकतो. ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कच्या परिसरात असलेल्या या खोऱ्यात डोंगर, नद्या, जंगलं आणि छोटी-छोटी गावं असा सुंदर निसर्ग अनुभवायला मिळतो. नदीकाठी निवांत बसणं, आसपासच्या गावांमध्ये भटकणं किंवा छोट्या ट्रेकवर जाणं, इथं करण्यासारख्या गोष्टी आहेत, पण त्यासाठी घाई करण्याची गरज नाही. निसर्गाच्या सान्निध्यात घालवलेले हे काही दिवस तुम्हाला पुन्हा नव्या ऊर्जेने भरून काढतील.

गोकर्ण, कर्नाटक

समुद्रकिनारा, हिरवाई आणि निवांत वातावरण यांचा सुंदर मेळ अनुभवायचा असेल, तर गोकर्ण तुमच्यासाठी योग्य ठिकाण ठरू शकतं. गोव्याची आठवण करून देणारे समुद्रकिनारे असूनही गोकर्ण तुलनेने कमी गजबजलेलं आणि अधिक निवांत वाटतं. इथल्या शांत समुद्रकिनाऱ्यावर निवांत फेरफटका मारणं, सूर्यास्त पाहणं, योग किंवा मेडिटेशन रिट्रीटमध्ये सहभागी होणं आणि स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेणं, या सगळ्यामुळे सुट्टीचा खरा अर्थ अनुभवता येतो. इथं फिरण्यापेक्षा थांबून अनुभवण्याला अधिक महत्त्व आहे.

लोंगवा गाव, नागालँड

काहीतरी वेगळं आणि नेहमीच्या पर्यटनापेक्षा पूर्णपणे हटके अनुभवायचं असेल, तर नागालँडमधील लोंगवा गावाची निवड करू शकता. भारत-म्यानमार सीमेवर वसलेलं हे गाव आपल्या अनोख्या भौगोलिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांसाठी ओळखलं जातं. लोंगवामध्ये कोन्याक जमातीची परंपरा आणि जीवनशैली जवळून पाहता येते. गावातील काही घरं थेट भारत-म्यानमार सीमेवर असल्यामुळे या ठिकाणाचा अनुभव आणखी खास बनतो. इथं आधुनिक हॉटेल्सपेक्षा होमस्टेमध्ये राहण्याचा अनुभव अधिक महत्त्वाचा आहे. सुविधा मर्यादित असल्या तरी स्थानिक लोकांचं जीवन, परंपरा आणि संस्कृती जवळून अनुभवण्याची संधी मिळते. शहराच्या गोंगाटापासून अक्षरशः दूर जाण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.

मावलिनोंग, मेघालय

मेघालयातील मावलिनोंग हे स्वच्छता आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेलं सुंदर गाव आहे. हिरवीगार झाडं, डोंगर, धबधबे आणि पारंपरिक जीवनशैली यामुळे स्लो ट्रॅव्हलसाठी हे ठिकाण विशेष आकर्षक ठरतं. इथली प्रसिद्ध लिव्हिंग रूट ब्रिजेस पाहताना निसर्ग आणि स्थानिकांच्या पारंपरिक ज्ञानाचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. गावात फिरताना स्वच्छतेबाबतचे स्थानिक नियम पाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. महागड्या किंवा आलिशान हॉटेलमध्ये राहण्याऐवजी पारंपरिक होमस्टेमध्ये मुक्काम करून स्थानिक कुटुंबांसोबत वेळ घालवा. घरगुती पद्धतीचं स्थानिक जेवण चाखा, गावातील जीवनशैली समजून घ्या आणि निसर्गाचा निवांत आनंद घ्या.

सुट्टी म्हणजे फक्त फिरणं नाही, तर स्वतःसाठी थांबणं!

सततच्या धावपळीमुळे जर मन आणि शरीर दोन्ही थकले असतील, तर पुढच्या सुट्टीत जास्तीत जास्त ठिकाणं कव्हर करण्याचा हट्ट सोडा. एखाद्या शांत ठिकाणी काही दिवस मुक्काम करा, सकाळ निवांत सुरू करा, स्थानिक पदार्थ चाखा, निसर्गात वेळ घालवा आणि त्या ठिकाणाची जीवनशैली अनुभवून पाहा.

कदाचित परतीच्या प्रवासात तुम्हाला जाणवेल की, खरी सुट्टी म्हणजे कुठेतरी जाणं नाही, तर काही काळासाठी सगळ्या धावपळीपासून स्वतःला दूर ठेवणं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Lifestyle News