हिवाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत आणि यावेळी काहीतरी गरम खाण्याची इच्छा होते. बऱ्याचदा आपल्याला सूप पिण्याचा इच्छा होते, पण यावेळी सूप अनेकदा आपण बाजारामधून सूप मागवतो. पण बाहेरील धुळीतलं सूप पिण्यापेक्षा आजच्या या लेखामध्ये तुम्हाला टोमॅटो-गाजर सूप रेसिपी सांगणार आहोत. टोमॅटो आणि गाजरामध्ये अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात, जी संतुलित आहाराचा भाग असू शकतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे, ते बनवण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्याची गरज लागत नाही. सकाळी गरम सूप प्यायल्याने तुमचा मूड तर ताजा होतोच, शिवाय एक उत्तम चवही मिळते. चला तर मग, नाश्त्यासाठी टोमॅटो-गाजर सूपची सोपी पाककृती आणि ते कसे बनवायचे ते पाहूया.
टोमॅटो – 2
गाजर- 1
पाणी – 1 कप
लसणाच्या पाकळ्या – 2
लोणी किंवा तेल – 1 चमचा
मीठ - चवीनुसार
काळी मिरी - चिमूटभर
हिरवी कोथिंबीर
टोमॅटो-गाजर सूप तयार करण्यासाठी सर्वात आधी सूप तयार करण्यासाठी टोमॅटो आणि गाजर स्वच्छ धुवून घ्या आणि दोघांचेही लहान तुकडे करा. त्यानंतर पुढची स्टेप आता एका पॅनमध्ये बटर किंवा तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला लसूण घालून काही सेकंद परता. पॅनमध्ये चिरलेले टोमॅटो आणि गाजर घाला, एक कप पाणी टाका आणि झाकण ठेवा. भाज्या मऊ होईपर्यंत, सुमारे 10 मिनिटे शिजवा. भाज्या शिजल्यावर गॅस बंद करा आणि मिश्रण थोडे थंड होऊ द्या. त्यानंतर, ते मिक्सरमध्ये घालून चांगले बारीक वाटून घ्या.
वाटलेले मिश्रण परत पॅनमध्ये घाला, चवीनुसार मीठ आणि मिरपूड घालून सूप 5 मिनिटे गरम करा. तयार केलेले सूप एका वाटीत ओता आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम वाढा. जर तुम्हाला सकाळी काहीतरी हलके खावे किंवा प्यावेसे वाटत असेल, तर हे सूप एक चांगला पर्याय आहे.