लव मॅरेज म्हणजेच आपल्या आवडीच्या व्यक्तीशी लग्न करणे किंवा प्रेम विवाह करणे. आजच्या या दशकामध्ये फार काही नवीन नाही, पण नात्यांमध्ये लगेचच दुरावा विश्वासघात होतो आणि घटस्फोट होणे या गोष्टी आजकाल फार जास्त सुरु आहेत. पण सातत्याने अनेकांना नात्यामध्ये सातत्याने दुरावा येण्याची कारणे कोणती? तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की असे का घडते? प्रख्यात आध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराज जी यांनी या अत्यंत गंभीर विषयावर आजच्या पिढीला एक अतिशय सोपा आणि सत्य सल्ला दिला आहे यासंदर्भात सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत.
प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी अनेकजण येत असतात, जेव्हा प्रेमानंद महाराजांना प्रेमविवाह केल्यानंतर होणाऱ्या घटस्फोटाबद्दल विचारण्यात आला. एका व्यक्तीने प्रेमानंद महाराजजींना विचारण्यात आले की, प्रेमापोटी लग्न करणारी जोडपी अनेकदा एकमेकांना का फसवतात, तेव्हा त्यांनी सडेतोड उत्तर दिले. त्यांच्या मते, "प्रेमविवाह" याचा साधा अर्थ असा आहे की, तुम्ही खऱ्या प्रेमापोटी कोणालातरी तुमच्या आयुष्यात आणले आहे. पुढे ते म्हणाले की एखाद्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करुन स्वत:च्या इच्छेने हात धरलेला आहे तर मग त्याचा हात मध्येच सोडून देण्यामध्ये आणि दुसऱ्या कोणाकडे आकर्षित होण्यात काय अर्थ आहे.
यावर बोलताना प्रेमानंद महाराजांनी स्पष्टपणे सांगितले की, प्रेमविवाहानंतर जर तुम्ही घटस्फोटाचा किंवा विश्वासघाताचा विचार करत असाल, तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात आणि तुम्हाला आत्मसुधारणेची नितांत गरज आहे. अनेक नात्यांमध्ये भूतकाळातील नात्यांशी तुलना करणे यामुळे देखील भांडणे पाहायला मिळतात, एक काळ असा होता जेव्हा वधू आणि वर हे फक्त लग्नाच्या विधींमध्येच एकमेकांना पहिल्यांदा नीट पाहत होते. असे असूनही, त्यांचे नाते आयुष्यभर कोणत्याही कटुतेशिवाय सुंदरपणे टिकून राहिले आणि त्यांची कुटुंबेही समृद्ध झाली.
तुमचा जोडीदार पूर्वीसारखा तुमच्यासाठी वेळ काढत नाही का? तुम्ही जे बोलता त्यात त्याला कमी रस वाटतो का किंवा तो छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडतो का? असे असल्यास, याचा अर्थ असा होऊ शकतो की त्याचे लक्ष दुसरीकडे आहे. जर तुमचा जोडीदार त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती देणे टाळत असेल, त्यांचा फोन लपवत असेल किंवा थेट प्रश्नांना बगल देत असेल, तर हा एक धोक्याचा इशारा आहे. एक मजबूत नातेसंबंध नेहमीच पारदर्शकतेवर आधारलेला असतो. जी व्यक्ती तुमच्या भावनांना महत्त्व देत नाही, प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला दोष देते आणि तुमचा आदर करत नाही, ती कधीही एक चांगली जीवनसाथी होऊ शकत नाही . अशा व्यक्ती अनेकदा नात्यांमध्ये प्रामाणिक नसतात आणि भविष्यात दुःख देतात.