सुरुवातीला जेव्हा सोशल मिडियावर अनेक वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याचे ट्रेंड होते त्यावेळी टिकटॅाकवर व्हिडिओ तयार करुन फेमस झाले होते. त्यानंतर टिकटॅाक भारतामध्ये बंद झाले आणि इंस्टाग्रामवर रिल्स बनवण्याचा ट्रेंड आला होता. त्यानंतर टिकटॅाक बंद झाल्यानंतर इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवण्याचे वेगवेगळे अपडेट्स इंस्टाग्रामवर लॅान्च केले होते. अनेक नवनवे फिल्टर देखील येत असतात, जर तुम्ही इन्स्टाग्राम वापरत असाल, तर तुम्हाला शेअर मेन्यूमध्ये एक नवीन 'म्यूज' (Muse) पर्याय दिसू शकतो. आता अनेकांना प्रश्न आहे की 'म्यूज' म्हणजेच काय? त्याचा वापर कशासाठी होतो? यासंदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.
'म्यूज' हा पर्याय पहिल्यांदा पाहता, हे एक साधे शेअरिंग फीचर वाटू शकते, पण ते मेटाच्या 'म्यूज' नावाच्या एआय एजंटशी जोडलेले आहे. हे केवळ प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच नाही, तर दैनंदिन कामांचे नियोजन करणे, महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आणि विविध कामांचे आयोजन करणे यांसारख्या कामांमध्ये मदत करण्यासाठी देखील तयार केले आहे. तथापि, हे फीचर सध्या सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. चला आता जाणून घेऊया की मेटाचा 'म्यूज' काय आहे आणि त्याच्या मदतीने कोणती कामे केली जाऊ शकतात. आता या पर्या काय आहे यासंदर्भात देखील तुम्हाला खालीलप्रमाणे माहिती दिली आहे.
इन्स्टाग्रामचे नवे फिचर आले आहे त्यानंतर यावेळी अनेकाचा गोंधळ सुरु आहे. 'म्यूज फ्रॉम मेटा' हा दैनंदिन कामे सोपी करण्यासाठी तयार केलेला एक वैयक्तिक एआय एजंट आहे. इंस्टाग्रामच्या शेअर मेन्यूमध्ये 'म्यूज'चा पर्याय दाखवून, वापरकर्ते म्यूज-संबंधित ॲपची माहिती मिळवू शकतात. हा पर्याय निवडल्यावर 'म्यूज फ्रॉम मेटा' ॲपची सूची उघडते, जिथे त्याचे वर्णन एक वैयक्तिक एआय एजंट म्हणून केलेले असते.
म्यूज पर्याय सध्या सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. उपलब्धता ठिकाणानुसार आणि वापरकर्त्यानुसार बदलू शकते. त्यामुळे, जर तुम्हाला इंस्टाग्राम शेअर मेन्यूमध्ये म्यूज पर्याय दिसत नसेल, तर याचा अर्थ असा नाही की तुमच्या फोनमध्ये काहीतरी समस्या आहे. फक्त एवढेच आहे की हे फीचर तुमच्यासाठी अजून उपलब्ध नाही. म्यूजचा वापर केवळ माहिती विचारण्यापुरता मर्यादित नाही. ते विविध कामांच्या तयारी आणि नियोजनातही मदत करू शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी तिकीट खरेदी करण्याची तयारी करत असाल, तर एक एआय एजंट तिकिटांच्या किमतींवर लक्ष ठेवण्यासारख्या कामांमध्ये मदत करू शकतो. त्याचप्रमाणे, ते रात्रीच्या जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये आरक्षण करणे किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामाची तयारी करणे यांसारख्या कामांमध्येही मदत करू शकते.