तुमचं मूल माती किंवा भिंतीचा प्लास्टर खातंय? मुलांच्या आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक
अनेक लहान मुले चिकणमाती, खडू त्याचबरोबर भिंतीचे प्लास्टर तोंडात घालताना किंवा खाताना दिसत असतील त्याकडे दुर्लक्ष न करता या सवयींकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. या समस्येवर कोणते उपाय आहेत यासंदर्भात सविस्तर वाचा.
लहान मुले जेव्हा जमीनीवर खेळत असतात त्यावेळी अनेक लहान मुलांना चिकणमाती, खडू त्याचबरोबर भिंतीचे प्लास्टर तोंडात घालताना किंवा खाताना आपण पाहतो. अशावेळी जर तुम्ही त्या लहान मुलाचे पालक असाल तर मग बऱ्याचदा तुम्हाला या समस्येवर काहीही उपाय सुचत नाही आणि त्यामुळे मग चिंता देखील वाटत असते. अनेक पालक हे अनेकदा लहान मुलाची खोडी किंवा सामान्य सवय म्हणून देखील त्याकडे दुर्लक्ष करत असतात. पण जर तुमचं मुल हे वारंवार करत असेल तर गांभिर्याने घेण्यासाठी बाब आहे, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु नये.
अनेक लहान मुले चिकणमाती, खडू त्याचबरोबर भिंतीचे प्लास्टर तोंडात घालताना किंवा खाताना दिसत असतील त्याकडे दुर्लक्ष न करता या सवयींकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. असे तुमचे मुल सातत्याने करत असेल तर मुलांना पोटात जंत किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. कधीकधी, हे पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे किंवा 'पिका' नावाच्या स्थितीमुळे असू शकते. अशा परिस्थितीत, मुलाला ओरडण्याऐवजी, प्रेम आणि समजूतदारपणाने ही सवय मोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी केवळ औषधोपचाराचा आधार घेऊ नये; त्याऐवजी, ही सवय कमी करण्यासाठी काही युक्त्या अवलंबल्या जाऊ शकतात.
हे ही वाचा
नॉनव्हेज खाताय? चिकन, मटण आणि माशांपैकी कोणतं जास्त घातक, जाणून घ्या
वाचा समस्येवरील उपाय
- तुमचे मूल माती किंवा भिंतीचे प्लास्टर खात असेल, तर त्याला मारहाण किंवा ओरडण्याऐवजी त्याला प्रेमाने सांगा. या समजवा कि या वस्तू खाण्यायोग्य नाहीत, त्यामुळे वस्तू खाल्ल्याने पोटदुखी, जंतुसंसर्ग किंवा इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात हे समजवा.
- अनेकदा मुले ही कंटाळतात आणि त्याच्याकडे खेळण्यासाठी कोणी नसते, त्यावेळी मग परिसर पाहण्याच्या इच्छेपोटी चिकणमाती आणि प्लास्टर तोंडात घालू लागतात. अशावेळी मग लहान मुलांना खेळणी देऊन आणि चित्रकला, ठोकळे किंवा कोडी यांमध्ये गुंतवून ठेवल्यास त्यांचे लक्ष विचलित होण्यास मदत होऊ शकते.
- तुमचे मूल भिंतीवरून प्लास्टर खरवडून खात असेल, तर या समस्येकडे विशेष लक्ष द्या आणि निघालेले प्लास्टर दुरुस्त करुन तुमच्या मुलाला त्या भागापासून दूर ठेवा. अशावेळी फरशी आणि लहान मुलाच्या खेळाची जागा स्वच्छ ठेवा त्यामुळे सहजपणे घाण किंवा धूळ गिळणार नाही.
- जर तुमचे मूल जास्त प्रमाणात माती खाऊ लागले असेल आणि तुमच्या सर्व प्रयत्नांनंतरही ही सवय सोडत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.