SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

वय फक्त 25, पण लिव्हरला धोका! तरुणांमध्ये वाढतोय ‘फॅटी लिव्हर’; तज्ज्ञांनी काय दिलाय इशारा?

वय फक्त 25, पण लिव्हरला धोका! तरुणांमध्ये वाढतोय ‘फॅटी लिव्हर’; तज्ज्ञांनी काय दिलाय इशारा?

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Oct 03, 2026, 03:10 PM IST | Updated: Oct 03, 2026, 03:26 PM IST
Image Credit: एकेकाळी वाढत्या वयाशी जोडली जाणारी फॅटी लिव्हरची समस्या आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसू लागली आहे. अवेळी खाणे, फास्ट फूड, जास्त कॅलरी आणि साखर असलेले पदार्थ तसेच शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे तरुण वयातच लिव्हरमध्ये चरबी जमा होण्याचा धोका वाढत आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या जागतिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी परिषद २०२६ मध्येही या विषयावर चर्चा झाली. तज्ज्ञांच्या मते, वेळीच लक्ष न दिल्यास काही रुग्णांमध्ये फॅटी लिव्हर पुढे फायब्रोसिस आणि सिरोसिसपर्यंत जाऊ शकतो.
Join

एकेकाळी वाढत्या वयाशी जोडली जाणारी फॅटी लिव्हरची समस्या आता तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसू लागली आहे. अवेळी खाणे, फास्ट फूड, जास्त कॅलरी आणि साखर असलेले पदार्थ तसेच शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे तरुण वयातच लिव्हरमध्ये चरबी जमा होण्याचा धोका वाढत आहे. नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या जागतिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी परिषद २०२६ मध्येही या विषयावर चर्चा झाली. तज्ज्ञांच्या मते, वेळीच लक्ष न दिल्यास काही रुग्णांमध्ये फॅटी लिव्हर पुढे फायब्रोसिस आणि सिरोसिसपर्यंत जाऊ शकतो.


वय 25-26 वर्षे आणि ग्रेड-2 फॅटी लिव्हर

तज्ज्ञांच्या मते, अवघ्या 25 ते 26 वर्षांच्या तरुणांमध्ये ग्रेड-2 फॅटी लिव्हर आढळणे आता असामान्य राहिलेले नाही. लिव्हरमध्ये जास्त चरबी साचल्यानंतर काही लोकांमध्ये दाह निर्माण होऊ शकतो आणि पुढे फायब्रोसिस म्हणजे लिव्हरच्या ऊतींवर व्रण तयार होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. फायब्रोसिस गंभीर झाल्यास लिव्हरचे कायमस्वरूपी नुकसान आणि सिरोसिसचा धोका वाढतो. मात्र, प्रत्येक फॅटी लिव्हर रुग्णाला सिरोसिस होतोच असे नाही.


तरुणांमध्ये फॅटी लिव्हर वाढण्यामागे काय कारण?

इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अँड बिलिअरी सायन्सेसचे प्राध्यापक डॉ. अनूप सराया यांच्या माहितीनुसार, फॅटी लिव्हरचा संबंध केवळ वजन वाढण्याशी नाही. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि इतर चयापचयाशी संबंधित समस्या यांचाही त्याच्याशी संबंध आहे. फास्ट फूड, जास्त गोड पदार्थ व पेये, अधिक कॅलरीचे अन्न आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे धोका वाढू शकतो. केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांमध्येही लठ्ठपणा, टाइप-2 मधुमेह, रक्तातील चरबीचे असंतुलन आणि उच्च रक्तदाब यांचा फॅटी लिव्हरशी जवळचा संबंध असल्याचे नमूद केले आहे.


भारतातील आकडे चिंता वाढवणारे

भारतात एमएएसएलडीचे सुमारे 19.43 कोटी रुग्ण असल्याचा अंदाज आहे, तर एका वर्षात सुमारे 82.63 लाख नवीन प्रकरणे आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे. 2026 मधील फेनॉम इंडिया अभ्यासात 27 शहरांतील 7,764 लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये एमएएसएलडीचे प्रमाण 38.9 टक्के आढळल्याचे वृत्तात म्हटले आहे.


18 ते 30 वयोगटातील तरुणांमध्येही समस्या

18 ते 30 वर्षे वयोगटातील 2,373 भारतीय तरुणांच्या अभ्यासात 27.4 टक्के जणांमध्ये एमएएसएलडी आढळल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. यातील 2.27 टक्के तरुणांचा FIB-4 स्कोअर वाढलेला होता. हा स्कोअर लिव्हर फायब्रोसिसच्या जोखमीचे प्राथमिक मूल्यमापन करण्यासाठी वापरला जातो. विशेष म्हणजे, केवळ अल्ट्रासाऊंडमध्ये ग्रेड-2 फॅटी लिव्हर दिसल्याने फायब्रोसिस किंवा सिरोसिस असल्याचे निश्चित होत नाही. गरजेनुसार डॉक्टर फायब्रोस्कॅनसारख्या तपासण्यांचा सल्ला देऊ शकतात.


आठवड्यात किमान 150 मिनिटे व्यायाम

फॅटी लिव्हरचा धोका कमी करण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे, जास्त कॅलरीचे पदार्थ आणि गोड पेये कमी करणे, फास्ट फूड टाळणे आणि नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. आठवड्यात किमान 150 मिनिटे शारीरिक व्यायाम करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. वजन जास्त असल्यास ते अचानक कमी करण्याऐवजी नियोजनपूर्वक कमी करावे. फॅटी लिव्हर आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासण्या करून फायब्रोसिसचा धोका तपासणे महत्त्वाचे ठरते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES