नॉनव्हेज खाताय? चिकन, मटण आणि माशांपैकी कोणतं जास्त घातक, जाणून घ्या
हॅाटेलमधील मांसाहारी वेगवेगळे पदार्थ चाखण्याची अनेकांना चटक असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? मासांहारी पदार्थांपैकी तुमच्या आरोग्यासाठी सर्वात धोकादायक किंवा हानिकारक असू शकतो?
भारतामध्ये दोन्ही प्रकारचे लोक राहतात, काही असे आहेत की ज्यांना नॅानव्हेज खायला खुप आवडते तर काही पूर्णपणे शाकाहारी आहेत. काहीजण असेही आहेत जे मांसाहार फक्त काही वार असल्यावरच खातात. अनेक जणांना सातत्याने मासांहारी आहार करायला आवडते, पण जे तुमच्या ताटामध्ये चिकन, मटन किंवा मासे तुम्ही खात असाल तर तुमच्यासाठी हा लेख फार महत्त्वाचा आहे. अनेकजण जीममध्ये जातात आणि तेथे बऱ्याचदा प्रथिन्यांसाठी मांसाहार करण्याचा सल्ला दिला जातो, त्याचबरोबर हॅाटेलमधील मांसाहारी वेगवेगळे पदार्थ चाखण्याची अनेकांना चटक असते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? मासांहारी पदार्थांपैकी तुमच्या आरोग्यासाठी सर्वात धोकादायक किंवा हानिकारक असू शकतो?
आपण हॅाटेलमध्ये अनेकदा जात असतो आणि जे विशेषत: मासांहारी पदार्थ खात असतात ते हॅाटेलसारख्या ठिकाणी ते मासांहारीच पदार्थ खाणे निवडतात. चवीच्या नादात, आपण अनेकदा हे विसरतो की चुकीचा मांसाहारी पदार्थ निवडल्याने किंवा तो चुकीच्या पद्धतीने शिजवल्याने आपल्या शरीराला गंभीर हानी पोहोचू शकते. मटणाला "लाल मांस" मानले जाते, तर चिकन आणि माशांना "पांढरे मांस" म्हणून वर्गीकृत केले जाते. डॅाक्टरांच्या सल्ल्यानुसार लाल मांस हे आरोग्यासाठी सर्वात धोक्याचे मानले जाते त्याचे कारण म्हणजेच मटणामध्ये संतृप्त चरबी (सॅचुरेटेड फॅट) आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही सातत्याने मटण खात असाल तर हृदयरोग, उच्च रक्तदाब, युरिक ॲसिडची वाढलेली पातळी आणि लठ्ठपणा येऊ शकतो.
हे ही वाचा
चिला आणि भजी खाऊन कंटाळला आहात? संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा क्रिस्पी सोयाबीन
दुसरीकडे चिकन आणि मासे हे लाल मांस म्हणजेच मटणापेक्षा खुप हलके आणि पचायला अधिक सोपे असतात. त्याचबरोबर चिकनमध्ये प्रथिने देखील भरपूर असतात, तर मांसांबद्दल सांगायचे झाले तर मासे हे सर्वात आरोग्यदायी मांसाहारी अन्न मानले जाते कारण त्यात ओमेगा-३ फॅटी ॲसिड असतात, जे हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर असतात. तथापि, बाजारात उपलब्ध असलेल्या काही प्रक्रिया केलेल्या माशांमध्ये पारा किंवा फॉर्मेलिन रसायने असू शकतात. शिवाय, मासे खाताना लक्षात ठेवण्यासारखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे माशांसोबत दूध, दही किंवा आंबट पदार्थ कधीही खाऊ नयेत.
मांसाहारी पदार्थ खाण्याचा खरा धोका हा फक्त त्याच्या प्रकारामध्येच नाही तर स्वयंपाकघरामध्ये तो जेव्हा आपण स्वच्छ करण्यापासून ते शिजवण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे आहे. अनेकदा बाजारातून चिकन किंवा मटण आणतात आणि ते एका बेसिनमध्ये नळाखाली पटकन धुतात. ही स्वयंपाकघरातील सर्वात मोठ्या चुकांपैकी एक आहे! स्वयंपाकाच्या चुकीच्या पद्धतींमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. स्वयंपाकाच्या पद्धतींमध्ये गंभीर त्रुटी देखील असू शकतात. मांसाहारी पदार्थ जास्त तेलात तळणे किंवा जास्त आचेवर (तंदुरी किंवा बार्बेक्यू पद्धतीने) जास्त करपवणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. जेव्हा मांस जास्त तापमानावर शिजवले जाते, तेव्हा त्यात कर्करोग निर्माण करणारे हानिकारक घटक तयार होतात. याशिवाय, अर्धवट शिजवलेले मांसाहारी पदार्थ देखील आरोग्यासाठी हानिकारक असतात.
अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. याला व्यावसायिक वैद्यकीय सल्ला, वैद्यकीय तपासणी किंवा उपचारांचा पर्याय मानू नये.