SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

तरुणींमध्ये हार्ट डिसिजचा धोका वाढला? तारुण्य, करिअर आणि नव्या जबाबदाऱ्यांचा हृदयावर गंभीर आघात

युवा तरुणींमध्ये हार्ट डिसिज मध्ये वाढ होत आहे. तारुण्य, करिअर आणि नव्या जबाबदाऱ्या यामुळे जीवशैली बदल आहे. अल्कोहोल, धूम्रपान याच्या विळख्यात तरुणी अडकत आहेत.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 06, 2026, 05:20 PM IST | Updated: Oct 06, 2026, 05:26 PM IST
Join

आरोग्य : सगळं सुरळीत सुरू असतं, तारुण्य मनमुरादपणे जगणं, नव्या जबाबदाऱ्या आणि करिअरच्या दिशेनं नवी वाटचाल सुरू असते. पण याच धावपळीत अनेक तरुण मुलींच्या नकळत त्यांच्या हृदयावर गंभीर आघात होत आहेत. युवा तरुणींमध्ये हार्ट डिसिज मध्ये वाढ होत आहे. 
 

 तरुण मुलींनो, छातीत होणारी धडधड, सतत येणारी चक्कर किंवा दम लागणे ही केवळ अँक्झायटी किंवा अभ्यासाची चिंता नाहीये. तुमचे शरीर तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपण तारुण्यात इतक्या नवीन गोष्टींना सामोरे जात असतो की, त्या सगळ्याचा ताण शरीरावर आणि हृदयावर येत असतो. यामुळे छातीत दुखणं, श्वास लागणं किंवा हृदयाचे ठोके अनियमित होणं यांसारख्या त्रासांना सामोरं जावं लागतं. हळूहळू हा त्रास वाढू लागतो. अचानक डोळ्यांसमोर अंधारी येऊन चक्कर येण्याचे प्रकार वाढू लागतात. कधी कधी अगदी निवांत बसलेलं असतानाही हृदयाचे ठोके प्रत्येक मिनिटाला 110 ते 115 पर्यंत पोहोचतात, तर थोडी जरी धावपळ केली तरी ते 150 च्या पार जातात. 

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा या मुली तज्ज्ञांचा सल्ला घेतात, तेव्हा अनेकदा या मुली मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झाल्याचं दिसून येते. अल्कोहोल , धूम्रपान हे कार्पोरेट लाइफ मध्ये नित्याच्या गोष्टी होत आहेत. विशी-तिशीतल्या तरुणींच्या लेट नाईट पार्टीज वाढत असूनही नियमित तपासण्यांमध्ये, जसे की इको-कार्डिओग्राममध्ये, हृदयाची रचना आणि कार्यक्षमता अगदी सामान्य दिसू शकते.

केवळ ईसीजी तपासणीत धडधड सतत वेगाने धावत असल्याचे दिसू शकते. हृदयातील काही जन्मजात दोष किंवा अडथळ्यांमुळे फुफ्फुसातून शुद्ध रक्त घेऊन येणाऱ्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो. यामुळे फुफ्फुसावर प्रचंड दाब निर्माण होतो आणि थोडं जरी चाललं किंवा श्रम झाले तरी दम लागू लागतो आणि प्रचंड थकवा येतो. अशा वेळी आजाराचे मूळ शोधण्यासाठी प्रगत इमेजिंग तपासणी करणे अत्यंत गरजेचे असते. त्यासोबत आपली लाईफ स्टाईल बदलवून स्ट्रेस विना जगणे आवश्यक असते.
तुमचं आयुष्य केवळ करिअर किंवा महत्त्वाकांक्षांपुरतं मर्यादित नसून, ते निरोगी आणि सुरक्षित राहणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.त्यासाठी सजग राहा फिट राहा फक्त आपल्या शरीरातून दिलेल्या संदेशांकडे लक्ष द्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES