SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

जॅम आणि च्युइंगम खाणाऱ्यांना हार्ट अॅटॅक, ब्रेन स्ट्रोक आणि मृत्यूचा धोका; जाईलिटोलमुळं वाढतोय हृदयविकाराचा धोका?

जॅम आणि च्युइंगम खाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. जॅम आणि च्युइंगम खाणाऱ्यांना पुढील काही वर्षात हार्ट अॅटॅक, ब्रेन स्ट्रोक आणि मृत्यूचा धोका उद्भवणार आहे

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 02, 2026, 05:38 PM IST | Updated: Oct 02, 2026, 05:41 PM IST
Join

जॅम आणि च्युइंगम खाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. जॅम आणि च्युइंगम खाणाऱ्यांना पुढील काही वर्षात हार्ट अॅटॅक, ब्रेन स्ट्रोक आणि मृत्यूचा धोका उद्भवणार आहे. हे आम्ही नाही तर एका अभ्यासातून पुढे आलेलं आहे. फक्त जॅम आणि च्युइंगमच नाही तर कोणताही गोड पदार्थ ज्यात जाईलिटोल वापरलं गेलंय. नेमकं हे जाईलिटोल आहे तरी काय आणि याने आरोग्याचा आणि जिवीताचा धोका का उद्भवलाय?? याच प्रश्नांची उत्तरं देणारा हा खास रिपोर्ट

साखरेचा गोड पर्याय ठरतोय धोक्याची घंटा?

जाईलिटोलमुळं वाढतोय हृदयविकाराचा धोका?

युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीचं थक्क करमारं संशोधन


जॅम आणि च्युइंगमसह अनेक गोड पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जाईलिटोल या स्वीटनरबाबत एका अभ्यासातून धक्कादायक बाब समोर आलीये. तुम्हाला गोड पदार्थ आवडत असतील तर हे संशोधन तुमच्या कामाचं आहे. गोड पदार्थ आमि डायबिटीस हे समिकरण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, मात्र यापेक्षाही चिंताजनक बाब आता समोर आलीये. गोड पदार्थांचा धोका थेट हृदयापर्यंत जाऊन पोहोचलाय.

तब्बल 17 हजार 710 लोकांच्या सॅम्पल्समधून घेतलेला हा डेटा. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या माध्यमातून करण्यात आलेलं हे संशोधन थक्क करणारं आहे. ही परिषद जगातील मोठ्या हृदयाच्या आरोग्याबाबतची परिषदांपैकी एक आहे.

जाईलिटोलसारख्या स्वीटनरचा वापर अनेक खाद्यपदार्थांमध्ये करण्यात येतो. कमी कॅलरी असल्यामुळे अनेकांना असे पदार्थ सामान्य साखरेपेक्षा फायदेशीर वाटतात. पण या सगळ्यामुळे या स्वीटरनरच्या बापराबाबत एक अभ्यास करण्यात आला ज्यातून अशा पदार्थांचं सेवन जास्त होत असल्याचं निदर्शनास आलंय. खरंतर जाईलिटोलसारख्या स्वीटनरचा वापर अनेक खाद्यपदार्थांमद्ये केला जातो. आणि लोक अनेकदा हे पदार्थ आरोग्यासाठी चांगले आहेत असं समजून त्यांचं सेवन जास्त करतात.


जाईलिटोल म्हणजे नेमकं काय तर- एखादा खाद्यपदार्थाला गोड चव आणण्यासाठी जाईलिटोल या प्रकाराच्या स्वीटनरचा वापर केला जातो. हा एक शुगर अल्कोहोल असून त्याची चव साखरेसारखीच असते. मात्र सामान्य साखरेच्या तुलनेत यामध्ये कॅलरी कमी असतात. त्यामुळे कमी कॅलरी असलेला पर्याय म्हमून जाईलिटोलचा वापर होतो. जॅम आणि च्युइंगम आणि इतर काही खाण्याच्या पदार्थांमध्ये ते वेगवेगळया प्रमाणात वापरले जाते


जाईलिटोलमुळे आरोग्याला कसा धोका?

- जास्त प्रमाणात जाइलिटोलचे सेवन केल्यामुळे पोटात गॅस तयार होणे आणि पोट फुगण्याच्या समस्या उद्भवू शकतात.

- या कृत्रिम गोड पदार्थाच्या अतिवापरामुळे बद्धकोष्ठतेनंतर थेट अतिसार किंवा तीव्र जुलाब होऊ शकतात.

- काही संशोधनांनुसार, शरीरात जाइलिटोलचे प्रमाण वाढल्यास रक्त गोठण्याची (Blood Clots) प्रक्रिया प्रभावित होऊन हृदयविकाराचा धोका बळावू शकतो.

जाईलिटोलचा फक्त अपव्ययच नाही तर या घटकाचे काही फायदेही आहेत. जाईलिटोलचा फायदा पाहायला गेलं तर तोंडातील काही बॅक्टेरिया त्याचं पचन करु शकत नाहीत त्यामुळे या बॅक्टेरियांची स्ख्या कमी होण्यास मदत होते आमि दातांना कीड लागण्याचा धोका कमी होऊ शकतो, याच कारणामुळे च्युईंग गमसारख्या पदार्थांमध्येही जाईलिटोलचा वापर केला जातो

पण जाईलिटोल थेट हार्ट अॅटॅक घडवून आणतो असं नाही. कारण असं संशोधनातीन सिद्ध झालेलं नाही. याचं कारण असं की हे संशोधन एक ऑब्जर्वेसनल स्टडी आहे. म्हमजे संशोधकांनी जाइलिटोलचं प्रमाण आमि त्यांच्या आरोग्यावर झालेले परिणाम यांचा संबंध पाहिला. त्यामुळे जाईलिटोलमुळेच हार्ट अॅटॅक किंवा स्ट्रोक झाला असा थेट निष्कर्ष यातून काढता येणार नाही. त्यामुळे या एका अभ्यासाच्या आधारावर जाईलिटोल असलेले पदार्थ पूर्णपणे बंद करावेत असाही निष्कर्ष काढता येत नाही. कारण या अभ्यासातून जाईलिटोल आणि हार्ट अॅटॅकचा धोका यांच्यात संबंध दिसून आला आहे. मात्र जाईलिटोलमुळेच हा धोका निर्माण होतो हे सिद्ध झालेलं नाही

त्यामुळे जाईलिटोल आणि त्याच्या परिणामांना घाबरुन न जाता, गोड पदार्थांविषयी सतर्क राहणं आणि खाण्याचे काही नियम पाळणं हाच एक योग्य पर्याय ठरु शकतोय. राहा खबरदार!

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES