एकटे असताना हार्ट अटॅक आल्यास काय करावे? वाचा डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला
जर हृदयविकाराचा झटका आल्यावर रुग्ण एकटा असतो, अशा वेळी काय करावे हे सुचत नाही, त्यामुळे अशावेळी रुग्णाने काय करावे यासंदर्भात तुम्हाला सांगणार आहोत.
आजकाल दुषित हवामान त्याचबरोबर खराब वातावरणामुळे अनेक वेगवेगळ्या आजारांची लागण व्हायला वेळ लागत नाही. हार्ट अटॅक ही एक अशी समस्या आहे तो कधीही कोणाला होऊ शकते. हार्ट अटॅकमुळे अनेकांना पहिल्याच अटॅकमध्ये देखील जीव गमवावा लागत आहे. आजकाल हृदयविकाराच्या झटक्यांची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, हार्ट अटॅक ही एक आपत्कालीन स्थिती जर ही गंभीर परिस्थिती उद्धवल्यास वैद्यकीय मदत न मिळाल्याने परिस्थिती अधिक गंभीर होते. जर हृदयविकाराचा झटका आल्यावर रुग्ण एकटा असतो, अशा वेळी काय करावे हे सुचत नाही, त्यामुळे अशावेळी रुग्णाने काय करावे यासंदर्भात तुम्हाला सांगणार आहोत.
जर तुम्हाला अचानक छातीत दाब किंवा वेदना जाणवत असल्यास, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, थंड घाम येणे, चक्कर येणे, अशक्तपणा किंवा हृदयविकाराच्या झटक्याची इतर लक्षणे जाणवत असतील, तर घाबरून जाण्याऐवजी या गोष्टी लक्षात ठेवा. आयुर्वेदिक तज्ञ डॉ. सुगंधा शर्मा यांनी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे अशा 3 गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या हृदयविकाराच्या झटक्यासारख्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत खूप उपयुक्त ठरू शकतात.
डॉ. सुगंधा शर्मा यांनी सांगितल्यानुसार, जेव्हा हार्ट अटॅक सारखी चिन्हे शरीरामध्ये जाणवत असल्यास सर्वात आधी वैदकीय मदत घेणे गरजेचे आहे. जर तुम्हा अशा परिस्थितीमध्ये एकटे असाल तर मग स्वतः गाडी चालवण्याऐवजी, तात्काळ आपत्कालीन हेल्पलाइन 112 वर फोन करा. तसेच, मदतीसाठी त्वरित उपलब्ध होऊ शकतील अशा जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्रालाही फोन करा. डॅाक्टरांनी पुढे सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्यासारखी लक्षणे जाणवत असतील, तर अशा वेळी तुम्ही ताबडतोब ॲस्पिरिन (डिस्प्रिन) घेऊ शकता. तुमच्याकडे 325 मिग्रॅची ॲस्पिरिनची गोळी असल्यास, तुम्ही ती चावून खाऊ शकता किंवा पाण्यात विरघळवू शकता. ती थेट गिळू नका याची काळजी घ्या, कारण तिचे शोषण खूप हळू होते.
सॉर्बिट्रेटच्या गोळ्या स्वतःहून घेऊ नका
हृदयविकाराच्या झटक्यासारखी लक्षणे जर एखाद्या रुग्णाला जाणवत असल्यास अनेक लोक सॉर्बिट्रेटची गोळी जिभेखाली ठेवतात. पण ते धोकायदायक ठरु शकते, त्याचे कारण म्हणजेच सॉर्बिट्रेट हे रक्तवाहिन्या विस्तीर्ण करणारे (vasodilator) औषध आहे, ज्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. जर तुमचा रक्तदाब जास्त असेल, तर ही गोळी फायदेशीर ठरू शकते. जर तुमचा रक्तदाब कमी असेल, तर त्यामुळे बेशुद्ध पडण्यासारखी गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. हृदयविकाराच्या झटक्यासारख्या परिस्थितीत एकटे असताना लोक खूप घाबरतात. अशा स्थितीत तुम्ही तुमचे पाय शरीराजवळ ठेवावेत आणि एकाच जागी आरामात बसावे.