)
रत्नागिरी जिल्ह्यात ट्रिगर-२ नुसार आणखी चार तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. मंडणगड, दापोली, खेड आणि लांजा या तालुक्यांचा नव्याने समावेश झाला आहे. यापूर्वी रत्नागिरी, राजापूर आणि संगमेश्वर हे तीन तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले होते. त्यामुळे आता जिल्ह्यातील सात तालुक्यांचा समावेश झाला आहे. मात्र, चिपळूण आणि गुहागर तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीत स्थान मिळालेले नाही. पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आर्थिक मदतीबाबत स्वतंत्र शासन निर्णय जाहीर होणार आहे.
अंकिता भंडारीच्या कुंटूंबाला भेटण्यासाठी राहुल गांधी इंडिया गेटकडे रवाना
2022 मध्ये अंकिता भंडारीची हत्या झाली होती
आई वडीलाच्या भेटीसाठी राहुल गांधी रवाना
केंद्रीय मंत्रिमंडळ विक्री आणि पुनर्रचनेला मंजुरी, फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्ज या कंपनीला ६० टक्क्यांहून अधिक हिस्सा विक्रीला मंजुर. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती, यामुळे आर्थिक सेवा क्षेत्रात नवीन भांडवल येणार.
परकीय थेट गुंतवणुकीला चालना मिळणार
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह लघुउद्योजकांना नव्या संधी उपलब्ध होणार
पुनर्रचित बँकेत केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाचा मिळून ३४ टक्के हिस्सा कायम राहणार
Sujat Ambedkar LIVE | छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्षप्रवेश
जंतर-मंतरला आंदोलनाच्या ठिकाणांच्या यादीतून वगळण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, दिल्ली पोलिसांच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल. लक्ष्य सैनी आणि तुषार गुप्ता या वकिलांनी दाखल केली याचिका. जंतर-मंतर हे दिल्लीत आंदोलन करण्याचे प्रमुख ठिकाण असल्याचे याचिकेत नमूद. आंदोलकांना शहरापासून दूरच्या ठिकाणी पाठवल्यास नागरिकांना आपला आवाज उठवणे आणि निषेध नोंदवणे कठीण होईल, असा युक्तिवाद.
मेरठमध्ये पतीच्या हत्येप्रकरणी मुस्कान आणि प्रियकर साहिलला फाशीची शिक्षा, पतीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे निळ्या ड्रममध्ये भरल्याचा आरोप. जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश अरविंद कुमार यांनी सुनावली शिक्षा, दीड वर्षांच्या सुनावणीनंतर न्यायालयाचा निर्णय. ड्रम, चाकू आणि औषधे विकणाऱ्यांसह २२ साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली.
पनीर म्हणून विकल्या किंवा ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या नॉन-डेअरी पदार्थांवर कारवाई करण्याची मागणी, दिल्ली हायकोर्टाने FSSAI, केंद्र सरकार, दिल्ली सरकार आणि अन्न सुरक्षा आयुक्तांकडून मागितले उत्तर. संबंधित यंत्रणांना सहा आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे न्यायालयाचे निर्देश, सणासुदीच्या काळात अशा पदार्थांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवण्याची याचिकाकर्त्यांची मागणी. मात्र, तूर्तास कोणतेही अंतरिम आदेश देण्यास न्यायालयाचा नकार, कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती नितीन वासुदेव सांबरे आणि न्यायमूर्ती संजय शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी.
मावळच्या तळेगाव एमआयडीसीमध्ये ह्युंदाईच्या नव्या उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलंय. या प्रकल्पासाठी ११ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून, सुमारे १८ हजार रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. या प्लांटमध्ये दरवर्षी ३ लाख २० हजार मोटारींचं उत्पादन करण्याचं उद्दिष्ट आहे. जनरल मोटर्सकडून प्रकल्प हस्तांतरित करताना अनेक अडचणी आल्या, मात्र आता हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं उभा राहत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. या प्रकल्पामुळे मावळच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासोबतच स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील चिथावणीखोर वक्तव्यांवरून बी जी कोळसे पाटील यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल सोलापूर ब्रेकिंग - MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील चिथावणीखोर वक्तव्यांवरून बी जी कोळसे पाटील यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव येथील खासगी कार्यक्रमांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील हे एकत्र आल्याचे पाहायला मिळालं. यावेळी जयंत पाटील यांनी स्वतःहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ जाऊन चर्चा केली त्यावेळी शेजारी शरद पवार हे देखील होते. त्यानंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झाल आहे, यावेळी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय चर्चा झाली याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नागपुरात विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. CJP, AISF आणि NSUI या विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते एकत्र येत या आंदोलनात सहभागी झाले. नागपुरातील व्हेरायटी चौकापासून संविधान चौकापर्यंत हा मार्च काढण्यात आला. यावेळी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अकोला शहरातील प्रतिबंधित मार्गांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने आजपासून धडक मोहीम सुरू केली आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई करण्यात आली. दुकानांसमोरील शोकेस, साहित्य तसेच टीनपत्र्यांचे शेड यांसारखी अतिक्रमणे हटविण्यावर मनपा प्रशासनाचा भर आहे
मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त गणेश शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली 13 ते 16 ऑक्टोबरदरम्यान ही मोहीम राबविण्यात येत आहे.
भाजप कडून आयोजित नवीन मतदार नोंदणी शिबीराच्या अनधिकृत फलकावर कारवाईचे निर्देश, विशेष म्हणजे या फलकावर स्वत: रितु तावडेंचाही फोटो होता, महापौरांची थेट मैदानात उतरून अनधिकृत फलकांविरोधात मोहीम. अनधिकृत फलकावर कारवाही करून मोहीम तीव्र करण्याच्याही सूचना देण्यात आल्या होत्या. महापौरांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले फलक , स्वतः महापौरांनीच पालिका कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काढून टाकले.
संपूर्ण रायगड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली आहे. आज लोकसभा संपर्क प्रमुख संजय कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने रायगड जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. पावसा अभावी जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान झालं आहे. दाणे भरण्याच्या स्थितीत असताना पावसाने पाठ फिरवली परिणामी पीकच आले नाही त्यामुळे अन्नधान्याची स्थिती गंभीर होणार आहे. अपुऱ्या पावसामुळे भविष्यात पाणी टंचाई देखील भीषण होणार आहे. हे लक्षात घेऊन जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
साखरेला प्रतिकिलो 50 रुपये, तर इथेनॉलला प्रतिलिटर 70 रुपये दर द्या, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कर्नाटक मधील रयत संघटना आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारसोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटकात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन दुसऱ्या दिवशी देखील सुरू असून जो पर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तो पर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
मागील 3 दिवसांपूर्वी तुर्भे पोलिस ठाण्यात एक अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी पथक तयार करून तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही तपासून एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन निर्घृण खून केल्याचे निष्पन्न झालेय. तुर्भे पोलिसांनी आरोपीला नराधम आरोपीला अटक केली आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 14 october 2026 : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील याच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीमध्ये गिरीश महाजन, शंभूराज देसाई, प्रसाद लाड बैठकीसाठी उपस्थित होते. नाशिकच्या चांदवड तालुक्यात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. अवघ्या 14 वर्षे 16 दिवस वयाच्या मुलीने नवजात बालिकेला जन्म दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचं मागील आठवड्यात निधन झालं .त्याचबरोबर ठाण्यात शिवसेना UBT चे पूर्णेकर यांची हत्या झाली. या संदर्भाचा शोक प्रस्ताव महासभेत घेण्यात आला आणि त्यानंतर महासभा तहकूब करण्यात आली. आता ही महासभा आणखी किती दिवसांनी होते ते पाहावे लागेल.