SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणीत टर्निग पॉइंट; कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंना घेरलं!

21 जून 2022 रोजी मूळ पक्ष कोणाचा होता हे ठरवणे महत्त्वाचं असल्याचं सिब्बल यावेळी म्हणाले आहेत.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 25, 2026, 21:32 IST | Updated: Nov 25, 2026, 21:49 IST
Image Credit: कपिल सिब्बल यांनी एकनाथ शिंदेंना घेरलं!
Join

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूनं कपिल सिब्बल यांनी आज युक्तिवाद केला. 21 जून 2022 रोजी मूळ पक्ष कोणाचा होता हे ठरवणे महत्त्वाचं असल्याचं सिब्बल यावेळी म्हणाले आहेत. त्यामुळे सिब्बलांचा आजचा युक्तिवाद टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे..

शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद करत शिंदेंच्या शिवसेनेला घेरलं आहे. 26 जून रोजी विधानसभाध्यक्षांनी केलेल्या ठरावावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. तसंच शिंदेंना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय कसा चुकीचा होता हे निदर्शनास आणून दिलं, शिंदेंच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर कपिल सिब्बल यांनी जोरदार पलटवार केला आहे.

हे ही वाचा - '...मग अडीच वर्षे तुम्ही सरकारमध्ये काय करत होता?', सुप्रीम कोर्टात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित; शिंदेंची कोंडी? म्हणाले 'ठाकरेंची वागणूक...'

उद्धव ठाकरेंनी 22 जूनच्या बैठकीचे सादर केलेले पुरावे चुकीचं असल्याचा युक्तिवाद शिंदेंकडून करण्यात आला होता. तसंच विधानसभाध्यक्षांच्या निर्णय कसा योग्य होता, यासंदर्भातले
काही दाखले देखील ध्रुव मेहतांना दिले होते. मात्र विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पक्षपातीपणे निर्णय दिल्याचा आरोप खासदार अनिल देसाईंनी केला आहे. शिवसेना पक्ष-चिन्हासंदर्भात कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी एक मोठा दावा केला आहे.. शिवसेना पक्ष-चिन्ह एकतर ठाकरेंना दिलं जाईल नाहीतर ते गोठवलं जाईल असा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.

'....विधानसभेचा कार्यकाळ संपला हे कारण त्यासाठी पुरेसे ठरू शकत नाही'

केवळ विधानसभेचा कार्यकाळ संपला म्हणून न्यायालयांना न्यायिक पुनरावलोकनाचा अधिकार वापरण्यापासून रोखता येणार नाही. अपात्रतेची कार्यवाही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचली असताना विधानसभेचा कार्यकाळ संपला हे कारण त्यासाठी पुरेसे ठरू शकत नाही. सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची न्यायिक पुनरावलोकनाच्या माध्यमातून तपासणी करते तेव्हा संबंधित निर्णय देण्यात आला त्या वेळच्या परिस्थिती आणि तथ्यांच्या आधारे त्याची वैधता तपासली जाते. निर्णय दिल्यानंतर घडलेल्या कोणत्याही घटनेमुळे न्यायिक पुनरावलोकनाची व्याप्ती कमी होत नाही. आमदार अपात्रता प्रकरणाचा मूळ आधार आजही कायम आहे. कारण अपात्रतेच्या याचिका दाखल झाल्या, त्यावर युक्तिवाद झाला आणि निर्णयही झाला, त्या वेळी विधानसभा अस्तित्वात होती आणि संबंधित प्रतिवादी आमदार होते. सर्वोच्च न्यायालय 10 जानेवारी 2024 रोजी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाची वैधता तपासत आहे असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं.

'....त्या दिवशी मूळ राजकीय पक्ष कोणाचा होता'

अपात्रतेच्या कार्यवाहीत संबंधित आमदाराने आपल्या वर्तनातून स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले आहे का हे विधानसभा अध्यक्षांना ठरवायचे होते. यामध्ये आमदाराचे वर्तन महत्त्वाचे आहे. मूळ राजकीय पक्षाचे प्रतिनिधित्व कोणता गट करतो, याबाबत प्राथमिक निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असतो. ज्या दिवशी पक्षांतराची कृती प्रथम घडली, ती तारीख म्हणजे 21 जून त्यामुळे त्या दिवशी मूळ राजकीय पक्ष कोणाचा होता, हे ठरवणे आवश्यक आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES