SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

माजी मुख्यमंत्र्यांसह 4 आमदारांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा दावा, मराठी दिग्दर्शकाला अटक

माजी मुख्यमंत्र्यांसह ४ आमदारांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा आरोपींनी केला आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 18, 2026, 14:06 IST | Updated: Nov 18, 2026, 14:08 IST
Image Credit: Accused claimed give Death Threats to Former CM Ashok Chavan and 4 MLA
Join

राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्यासह चार आमदारांना उडवून देण्याचा कट रचला होता अशी भीती दाखवून व्यापाऱ्याला एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपी हा मराठी दिग्दर्शक असल्याचे समोर येतेय.

प्राथमिक माहितीनुसार, व्यापाराकडून खंडणी मागणारा आरोपी हा मराठी दिग्दर्शक असून त्याला मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातून अटक करण्यात आली आहे. मुळचा बीड जिल्ह्यातील रहिवाशी असलेला रवी रोकडे काही वर्षांपासून नांदेडमध्ये राहतो. नांदेडमधील व्यपारी महेश तुतारे आणि आरोपीची ओळख होती.  रवी रोकडे तुतारे यांना एक लाख रुपये मागत होता, असं समोर आलं आहे,

तीन वर्षांपूर्वी रचला होता कट

14 सप्टेंबर रोजी आरोपी रोकडे याने तुतारे यांना फोन करून पुन्हा एका लाखाची खंडणी मागितली. मी तीन वर्षांपूर्वी कारेगाव येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आणि नांदेडच्या चार आमदारांना उडवण्याचा प्लॅन केला होता, माझ्या पाठीशी मोठ्या लोकांचे हात आहेत, अशी भीती आरोपीने व्यापाऱ्याला दाखवली होती. त्यावरुन खंडणी मागितली होती.

तुतारे यांनी अशोक चव्हाण आणि आमदारांची नावंही घेतल्याने रोकडे यांनी प्रकरणात काहीतरी काळंबेरं दिसतंय हे पाहून थेट पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत रोकडे याला मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातून अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची पोलीसांनी प्रसिद्धी पत्रक काढून दिली आहे.

आरोपीने नेमक्या कोणत्या हेतूने हा कट रचला, यामागे त्याचे इतर साथीदार आहेत का? याचा सखोल तपास करण्यासाठी त्याला नांदेड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. व्ही. बोयणे करीत आहेत. दरम्यान, आरोपीने नेमके कोणत्या हेतूने हा बनाव रचला, यामागे इतर कोणी साथीदार आहेत का? किंवा अन्य कोणत्याही नेत्याबाबत घातपाताचा कट होता का? या सर्व बाजूंचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES