अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये व्हेटीलेटरचा स्फोट झाला तेव्हा कक्षसेविका पोर्च मध्ये झोपेत असल्याचं समोर आलं आहे. व्हेंटिलेटर फुटायच्या आधी कमी प्रमानात तीन वेळा आग लागली होती अशी धक्कादायक माहिती सीसीटीव्ही फुटेज मधून पुढे आली आहे. टॉपनर्स आणि कक्षसेविका ह्या SNCU मध्ये न झोपता बाहेर पोर्चमध्ये झोपल्याचेही पुढे आले आहे. जर त्या आत झोपल्या असत्या तर वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आलं असत अशी माहिती काँग्रेसचे नेते माजी मंत्री सुनील देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे.
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू विशेष काळजी कक्षात 24 ऑगस्ट 2026 रोजी लागलेल्या आगीत तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी यापूर्वीच पूर्ण झालीय. चौकशी अहवाल शासनास सादर झाल्यानंतर अहवालाच्या आधारे दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलंय. या दुर्घटनेत 36 बालकांना तातडीने अन्य रुग्णालयांमध्ये सुरक्षित हलविण्यात आले होते. याप्रकरणी, अधिकारी दोषी आढळून आले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून दोन कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केली गेली आहेत.
या प्रकरणी कामकाजातील हलगर्जीपणा, बेजबाबदार वर्तन, पर्यवेक्षीय नियंत्रणातील त्रुटी आणि अक्षम्य दुर्लक्ष यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ८ नुसार शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.