SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'10 आमदारांच्या...', भाजपा-पवार चर्चेत 'CM पदाची ऑफर'वरुन वडेट्टीवारांचा टोला; 'शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री...'

शरद पवारांनी डिलिमीटेशनच्या विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्रिपदासंदर्भात भाजपासोबत वाटाघाटी केल्याच्या चर्चांसंदर्भात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते काय म्हणाले जाणून घ्या...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 28, 2026, 10:58 IST | Updated: Nov 28, 2026, 11:14 IST
Image Credit: प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वडेट्टीवार यांचं विधान (प्रातिनिधिक फोटो)
Join

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाला शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पाठींबा देणार असल्याचा मुद्द्यावरुन कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. दिल्लीमध्ये ओबीसी मोर्चा निमित्त पोहोचलेल्या वडेट्टीवार यांनी शरद पवारांसारखे पुरोगामी नेते भाजपासोबत जातील असं वाटलं नव्हतं, असं म्हणताच शरद पवारांनी पाठिंब्याच्या मोबदल्यात पक्षासाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी केल्याच्या चर्चांवरही वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे या मागणीसंदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा संदर्भ दिला आहे. ते नेमकं काय म्हणालेत हे जाणून घेऊयात...

चर्चा काय?

शरद पवारांनी डिलिमीटेशनच्या मुद्द्यावरुन केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी समर्थन देण्यासाठी खासदार कन्या सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी केल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या माध्यमातून सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरतील वगैरे चर्चाही रंगल्याचं दिसून आलं. मुख्यमंत्रिपदाच्या मोबदल्यात डिलिमीटेशनसाठी आठ खासदार समर्थन देतील अशी चर्चा झाल्याचं बोललं गेलं. 

वडेट्टीवार काय म्हणाले?

शरद पवारांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळेंसाठी मुख्यमंत्रि‍पदाची मागणी झाल्याच्या चर्चांसंदर्भात वडेट्टीवार यांना विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना, "यामध्ये 10 आमदारांच्या विश्वासावर मुख्यमंत्री पदाची मागणी हास्यास्पद आहे," असं उत्तर वडेट्टीवार यांनी दिलं. पुढे बोलताना वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदेंकडे 60 आमदार असल्याची आठवण करून दिली. "शिवसेनेकडे 60 आमदार असताना शिंदेंना भाजपने मुख्यमंत्री पद दिले नाही," असं वडेट्टीवार म्हणाले. "महाराष्ट्राच्या वैचारिक विचाराला तुटडवण्यासाठी त्यांनी पाऊल उचलले तर त्यांना लखलाभ आहे," असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला. 

आमच्यामुळेच राज्यसभा खासदार, अशी आठवणही करुन दिली

मार्च महिन्यात झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार काँग्रेसच्या पाठिंब्याने खासदार झाल्याची आठवणही वडेट्टीवार यांनी करुन दिली. "आम्ही सर्वांनी त्यांना पाठिंबा देऊन राज्यसभेवर पाठवले. फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार पवारांच्या माध्यमातून जगाला पाहिजे अशी आमची भूमिका होती. पण लोकशाही संपविण्यात ज्यांचा वाटा राहील त्या यादीत शरद पवारांचे नाव येईल असे दुर्दैवाने वाटत आहे. हे हुकुमशाहीसाठी डिलिमिटेशन आहे असे आम्हाला वाटत आहे," असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

'पक्ष फुटेल म्हणून पाठिंबा'वरुनही सुनावलं

"कोणी म्हणत आहे पक्ष फुटण्याच्या भितीने पाठिंबा दिला. आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला तरी तुम्ही का फुटला? ते भाजपाच्या विमानात फिरले तरी आम्ही चिडणार नाही. ते भाजप सोबत गेले तरी आम्हाला आनंद आहे असे मी बोललो होतो. या लोकांना विचारच राहिला नाही," असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES