SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दिया मिर्झा प्रकरणाचा परिणाम... महाराष्ट्रात फटाके फोडण्याचा 'दिल्ली पॅटर्न'? सरकार घेणार मोठा निर्णय? नेमकं काय बदलणार?

मुंबई महापालिकेने अभिनेत्री दिया मिर्झा हिचा फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनिप्रदूषण रोखण्याबाबत जनजागृती करणारा व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटवला असून यावरुन वाद सुरु असतानाच ही बातमी समोर आली आहे.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 05, 2026, 10:13 AM IST | Updated: Nov 05, 2026, 10:25 AM IST
Image Credit: महाराष्ट्रात लागू होणार दिल्ली पॅटर्न? (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य - 'रॉयटर्स'वरुन साभार)
Join

अभिनेत्री दिया मिर्झाच्या दिवाळीसंदर्भातील व्हिडीओवरुन वादाला तोंड फुटलेलं असतानाच आता फटाके फोडण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 'दिल्ली पॅटर्न'चा उल्लेख करत काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळेच आता दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रामध्येही फटाके फोडण्याचा 'दिल्ली पॅटर्न' लागू होतो की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय आणि हा 'दिल्ली पॅटर्न' आहे तरी काय जाणून घेऊयात...

न्यायालयाने काय म्हटलं?

दिवाळीत फटाके फोडण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत वेळेची मर्यादा घालून दिली आहे. अशापद्धतीने फटाके फोडण्यासाठी वेळेची मर्यादा महाराष्ट्रातही घालून देता येईल का, याचा विचार करावा अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. राज्य सरकार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई महापालिका आणि पोलिसांना अशा चार प्रशासकीय संस्थांना ही सूचना केली आहे. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने यासंदर्भात 13 पानी आदेश दिला आहे. त्यात खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाने 29 ऑक्टोबरला दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या निर्देशांचा संदर्भही दिला आहे.

दिल्ली पॅटर्न काय?

सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके फोडण्यासंदर्भात दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची गंभीर परिस्थिती लक्षात घेत वेळेची मर्यादा आखून दिली आहे. त्यामुळेच दिल्ली-एनसीआरमध्ये दिवाळीत फटाके फोडण्यासाठी सकाळी 6 ते 7 आणि रात्री 8 ते 10 अशी वेळ सर्वोच्च न्यायालयाने निश्चित करून दिली आहे. दिल्लीचं उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन अशाच पद्धतीने स्थानिक परिस्थितीनुसार विचार करून महाराष्ट्रातही फटाके फोडण्यासाठी वेळ ठरवून देण्याबाबत उच्च न्यायालयाने सरकारला सूचना केली आहे. मुंबईसह राज्यातील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वायू व ध्वनिप्रदूषण होते. हेच प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाने विविध उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रदुषणाबद्दल चिंता

दिवाळी हा सर्व समुदायांकडून आनंदाने साजरा केला जाणारा राष्ट्रीय सण आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात आणि कोणतीही मर्यादा नसल्याने अनियंत्रण प्रमाणात फटाके फोडल्याने पर्यावरण, मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. फटाक्यांमुळे होणाऱ्या वायू प्रदुषणामुळे हवेच्या गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) अचानक वाढ होते. तसेच वातावरणात अनेक दिवस टिकून राहणारे सूक्ष्म कण निर्माण होतात, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले होते.

प्रदूषण कायद्यात तरतुदी

रुग्णालय, न्यायालय आदी शांतता क्षेत्रांत रात्री 10 ते सकाळी सहा फटाके वाजवण्यावर बंदी असल्याचा उल्लेख प्रदूषण कायद्यातील तरतुदीमध्ये आहे. याच आधारे सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांसंदर्भात वेळोवेळी निर्देशही दिले आहेत. मात्र ध्वनी व वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशिष्ट वेळेतच फटाके वाजविण्याची परवानगी देता येईल का, याबाबत विचार करण्याची सूचना आता उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारसहीत इतर चार संस्थांना केली आहे.

दिया प्रकरणाचा संदर्भ

मुंबई महापालिकेने अभिनेत्री दिया मिर्झा हिचा फटाक्यांमुळे होणारे वायू आणि ध्वनिप्रदूषण रोखण्याबाबत जनजागृती करणारा व्हिडीओ सोशल मीडियावरुन हटविल्याची स्वतःहून दखल घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने मंगळवारी फटाके फोडण्यासाठी वेळ मर्यादा घालून देण्याचे निर्देश दिले आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES