• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /महाराष्ट्र हादरला! तीन जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, केंद्रबिंदू दुसऱ्या राज्यात; तब्बल 160 किमी दूर

महाराष्ट्र हादरला! तीन जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, केंद्रबिंदू दुसऱ्या राज्यात; तब्बल 160 किमी दूर

अकोला, जळगाव आणि मलकापूरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी जाणवले धक्के

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 14, 2026, 10:43 AM IST|Updated: Nov 14, 2026, 10:54 AM IST
joinshare
महाराष्ट्र हादरला! तीन जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, केंद्रबिंदू दुसऱ्या राज्यात; तब्बल 160 किमी दूर
Image Credit: Earthquake tremors in Jalgaon Akola and Malkapur in maharashtra

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत भूकंपाचे हादरे बसले होते. आजही जळगाव, अकोलासह विदर्भातील काही जिल्हे भूकंपाने हादरले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर, भुसावळ, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यांना भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.

जिल्ह्यात अचानक जमीन हादरल्याने नागरिकांनी थेट घराबाहेर धाव घेतली. तर, भूकंपामुळं नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. जळगावातील भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य प्रदेशात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. तर, या भूकंपामुळं जिवीत अथवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अकोल्यातही भूकंपाचे धक्के

अकोलेकरांना आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. सकाळी 9 वाजून 16 मिनिटांच्या सुमारास अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक नागरिकांनी भूकंपाचे सौम्य धक्के अनुभवले.

दरम्यान, या भूकंपाचा केंद्रबिंदू नेमका कुठे होता आणि भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर किती होती, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, प्राथमिक माहितीनुसार या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.अकोल्यातील भूकंपाच्या धक्क्यांबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

बुलढाण्यातही भूकंपाचा धक्का

मलकापूर मधेही भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी जाणवला भूकंपाचा धक्का. भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेकांच्या घरातील साहित्यदेखील हलले. भूकंपाचा केंद्रबिंदू मध्यप्रदेश मधील खरगोन जिल्ह्यात असल्याचे समोर आले आहे. तर खरगोन मध्येही 4.5 रिश्टर स्केलचा धक्का बसला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Earthquake
News in Marathi