• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /गोकुळ दूध दरवाढीसंदर्भात मोठी अपडेट! मुख्यमंत्री आणि मुंबईमधील दूध विक्रेंते..., राजेश पाटील यांचा मोठा निर्णय

गोकुळ दूध दरवाढीसंदर्भात मोठी अपडेट! मुख्यमंत्री आणि मुंबईमधील दूध विक्रेंते..., राजेश पाटील यांचा मोठा निर्णय

मदर डेअरी आणि अमूल दूध वाढीनंतर गोकुळच्या दुधातही दरवाढ होणार आहे. पण यासंदर्भात नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 14, 2026, 10:45 AM IST|Updated: Nov 14, 2026, 10:49 AM IST
joinshare
गोकुळ दूध दरवाढीसंदर्भात मोठी अपडेट! मुख्यमंत्री आणि मुंबईमधील दूध विक्रेंते..., राजेश पाटील यांचा मोठा निर्णय
Image Credit: Gokul Milk Price

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी गोकुळ संघाची जबाबदारी घेतल्यानंतर झालेल्या पहिलाच संचालकांच्या बैठकीत दूध दरवाढीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत गोकुळच्या दूध खरेदी - विक्रीत वाढ करण्यावर चर्चा झाल्याचे संकेत होते. सीएनजी, पीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात येत आहे, असं महाराष्ट्रातील दूध उत्पादकांकडून सांगण्यात आलंय. तर मदर डेअरी आणि अमूल यांनी दूध दरवाढ केल्यानंतर गोकुळ दरवाढी करण्यात येणार असं समोर आलंय. यासंदर्भात गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.

गोकुळ दूध दरात वाढ होणार?

गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी सांगितलं की, गोकुळ दूध ग्राहकांना दिलासा दिला आहे. दूध दर वाढ लांबणीवर गेली आहे. पण टळली आहे, असं म्हणता येणार नाही. राजेश पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईमधील दूध विक्रेंते यांच्याशी संवाद साधल्यानंतर दूध दर वाढीबद्दल निर्णय होणार होणार आहे.  

दरम्यान महाराष्ट्रातील दूध उत्पादकांनी दरवाढीवर शिक्कामोर्तब करत आता 4 रुपयांनी दूध महागलंय. गायीचं दूध असो किंवा म्हशीचं यात 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ सोमवारी 16 नोव्हेंबर 2026 होणार आहे. राज्यातील 45 दूध संघाने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये  चितळे,कात्रज, सोनाई दुधाच्या दरात वाढ होणार आहे. पण गोकुळच्या दरात वाढ होणार की नाही याबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील असं राजेश पाटील यांनी माहिती दिली आहे.

हेसुद्धा वाचा - अमूलचा सर्वसामान्यांना मोठा झटका! दुधाच्या दरात वाढ, नवीन दर काय?

दूध संघाने सांगितलं की, गेल्या महिन्यांमध्ये डिझेल दरात वाढ, त्यामुळे ट्रान्सपोर्ट खर्च, साखरेच्या दरातील वाढ, पॅकिंग खर्च आणि मनुष्यबळ खर्चामुळे दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Breaking News
Maharashtra News