गोकुळ दूध दरवाढीसंदर्भात मोठी अपडेट! मुख्यमंत्री आणि मुंबईमधील दूध विक्रेंते..., राजेश पाटील यांचा मोठा निर्णय
मदर डेअरी आणि अमूल दूध वाढीनंतर गोकुळच्या दुधातही दरवाढ होणार आहे. पण यासंदर्भात नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
नूतन अध्यक्ष राजेश पाटील यांनी गोकुळ संघाची जबाबदारी घेतल्यानंतर झालेल्या पहिलाच संचालकांच्या बैठकीत दूध दरवाढीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत गोकुळच्या दूध खरेदी - विक्रीत वाढ करण्यावर चर्चा झाल्याचे संकेत होते. सीएनजी, पीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे दुधाच्या दरात वाढ करण्यात येत आहे, असं महाराष्ट्रातील दूध उत्पादकांकडून सांगण्यात आलंय. तर मदर डेअरी आणि अमूल यांनी दूध दरवाढ केल्यानंतर गोकुळ दरवाढी करण्यात येणार असं समोर आलंय. यासंदर्भात गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे.
गोकुळ दूध दरात वाढ होणार?
गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी सांगितलं की, गोकुळ दूध ग्राहकांना दिलासा दिला आहे. दूध दर वाढ लांबणीवर गेली आहे. पण टळली आहे, असं म्हणता येणार नाही. राजेश पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईमधील दूध विक्रेंते यांच्याशी संवाद साधल्यानंतर दूध दर वाढीबद्दल निर्णय होणार होणार आहे.
दरम्यान महाराष्ट्रातील दूध उत्पादकांनी दरवाढीवर शिक्कामोर्तब करत आता 4 रुपयांनी दूध महागलंय. गायीचं दूध असो किंवा म्हशीचं यात 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ सोमवारी 16 नोव्हेंबर 2026 होणार आहे. राज्यातील 45 दूध संघाने हा निर्णय घेतला आहे. यामध्ये चितळे,कात्रज, सोनाई दुधाच्या दरात वाढ होणार आहे. पण गोकुळच्या दरात वाढ होणार की नाही याबद्दल मुख्यमंत्री निर्णय घेतील असं राजेश पाटील यांनी माहिती दिली आहे.
हेसुद्धा वाचा - अमूलचा सर्वसामान्यांना मोठा झटका! दुधाच्या दरात वाढ, नवीन दर काय?
दूध संघाने सांगितलं की, गेल्या महिन्यांमध्ये डिझेल दरात वाढ, त्यामुळे ट्रान्सपोर्ट खर्च, साखरेच्या दरातील वाढ, पॅकिंग खर्च आणि मनुष्यबळ खर्चामुळे दूध दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.