गोकुळमध्ये कसं रचलं षडयंत्र? सतेज पाटलांनी सर्वच काढलं; '1400 संचालक वंचित... मी समोरुन लढाई करतो, पाठीत खंजीर..'
गोकुळ अध्यक्षपदावरुन राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला असून सतेज पाटलांनी कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढला. शासननियुक्त संचालक निर्णयाचा निषेध यावेळी करण्यात आला. यासाठी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा काढण्यात आला.
गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडीवरुन सत्तासंघर्ष शिगेला पोहोचलाय. सरकारने शासननियुक्त संचालक नेमण्याचा निर्णयाविरोधात आज समविचारी आघाडीने कोल्हापुरात संघर्ष मोर्चाची हाक दिलीय. मोर्चामध्ये सतेज पाटलांनी भाजप सरकारवर टीका केलीय. तर दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा असणार आहे. महायुतीकडून गोकुळवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करत सतेज पाटलांनी रणशिंग फुकलंय. सर्व सभासद दूध उत्पादकांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहनही सतेज पाटलांनी केलंय.
'संचालकांना वंचित ठेवण्याचे षडयंत्र'
1400 संचालकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा षडयंत्र रचण्यात आले. त्या मागे सदृश्य शक्ती म्हणण्यात आले. सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले अदृष्य शक्ती कोण हे बोलायचे धाडस हसन मुश्रीफ यांना झालेलं नाही.मी साडेपाच लाख शेतकऱ्यांसाठी लढत होतो, पण तुम्ही मात्र मुला बाळासाठी लढत आहात असे सतेज पाटील म्हणाले.
मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील जबाबदार
तुम्ही जातीवाद म्हणता. तुमचा मुलगा पडला असे बोलता, मग सुजित मिणचेकर पडला असे बोलत नाही. तुम्ही युवराज पाटील पडला असे म्हणत नाही. चार संचालक यांना अधिकार देण्यासाठी मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील जबाबदार आहेत. ते दोघे हे पाप करत असल्याचे पाटील म्हणाले.
'कोल्हापुरात तुम्हाला एक माणूस मिळत नाही'
अध्यादेश झाला पण जीआर मिळाला नाही. आम्ही शोधून काढले. तज्ञ संचालक म्हणून शिवाजी दिनकर पाटील,डॉ. प्रवीण हेंद्रे, कृष्णात पाटील, अॅड प्रशांत पाटोळे यांना नियुक्ती दिली सांगलीचा माणूस देण्यात आला. कोल्हापुरात तुम्हाला एक माणूस मिळू शकलेला नाही,अशी खंतही पाटील यांनी बोलून दाखवली.
'मी समोर येवून लढतो'
गोकुळ आत्ता अमूलच्या खशात घालण्याचे षडयंत्र आहे. त्याची सुरुवात सांगलीच्या संचालक नेमणूक झाली आहे. सरकारकला विनती आहे की तुम्ही नेमलेले 5 लोक पाठवू नका. तुमचे 12 संचालक पाठवा आणि निवडणूक होवू द्या. मी लढाई करायची असेल तर लढाई करतो. समोर येवून लढतो, पाठीत खंजीर खुपसत नाही, असे सतेज पाटील यांनी म्हटले. या चार लोकांच्या पुढे म्हैस आणि गाय उभी केली तर ते ओळखू शकत नाही. लढाईची सुरुवात केलीय. त्यामुळे तुम्ही अन्याय करू नका, असे आवाहनही सतेज पाटील यांनी केले.