SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

235 पूल, 45 गावं, 825 एकर जमीन अन् ₹10,145 कोटींचं बजेट... महाराष्ट्रात रेल्वेचा मेगा प्रोजेक्ट; लाखो प्रवाशांना होणार फायदा

सध्या हा मार्ग 138 टक्के क्षमतेने चालतो. म्हणजेच क्षमतेपेक्षा या मार्गावरून अधिक वाहतूक होत असून लवकरच ही समस्या सोडवली जाणार आहे. नेमका हा प्रोजेक्ट काय आणि कसा असणार पाहूयात...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 11, 2026, 13:39 IST | Updated: Nov 11, 2026, 13:54 IST
Image Credit: रेल्वे प्रशासन पाच वर्षात पूर्ण करणार (फोटो एआयवरुन साभार)
Join

रेल्वे प्रशासाने 10 हजार 145 कोटी रुपयांचा एक मेगा प्रोजेक्ट हाती घेतला आहे. या प्रोजेक्टमुळे मुंबई ते नाशिक प्रवास अधिक सुखकर होणार असून या मार्गावरील प्रवास अधिक वेगवान होऊन प्रवासी क्षमता वाढणार आहे. हा प्रकल्प नेमका आहे कसा? यासाठी कुठली जमीन सरकारला घ्यावी लागणार आहे? नेमका कोणत्या भागांना जोडणार हा प्रोजेक्ट जाणून घेऊयात...

45 गावांमधील 825 एकरांहून अधिक जमीन करणार अधिग्रहित

तर रेल्वे प्रशासनाचा हा महत्त्वकांशी प्रोजेक्ट कसारा-मनमाडदरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गासंदर्भातील आहे. यासाठी 45 गावांतील जमिनींचे अधिग्रहण केले जाणार आहे. ही गावं नाशिकसहीत एकूण पाच तालुक्यांमधील असून या शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या जाणार आहेत. एकूण 825.33 एकर म्हणजे 334 हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे.

कसा असणार हा प्रोजेक्ट?

या प्रकल्पामुळे मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रादरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे. कसारा-मनमाड दरम्यान, 24 किलोमीटर लांबीचा बोगदा उभारण्यात येणार रेल्वे मार्गावर 21 भुयारी मार्गांची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी 10 हजार 145 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे. प्रवासी वाहतुकीसोबत मालवाहतुकीलाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे. दरवर्षी, अतिरिक्त 4 कोटी 61 लाख टन मालवाहतूक हाताळणे या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे. उद्योग, व्यापार, शेतीमाल वाहतूक आणि पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

235 लहान-मोठे पूल 

कसारा-मनमाड मार्गावर एकूण 235 लहान-मोठे पूल उभारले जाणार असून यापैकी तीन महत्त्वाचे पूल असून 16 पूल मोठे तर 218 लहान पूल असतील. तसेच कसारा ते इगतपुरी या थळ घाट विभागात पाच नवीन बोगदे बांधले जाणार आहेत. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, कसारा घाटातील तीव्र चढामुळे सध्या गाड्यांना मागे 'बँकर इंजिन' जोडावे लागतात. नवीन मार्गिकांचा उतार सुसह्य असल्याने बँकर इंजिनांची गरज राहणार नसून यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार आहे. 

कोणत्या तालुक्यात किती गावं? थेट लोकल सुरु करण्याची संधी

निफाड तालुक्यातील 17 गावांमधील जमीन यासाठी वापरली जाणार आहे. तसेच नाशिकमधील 16, चांदवड तालुक्यातील 7, इगतपुरीमधील चार आणि नांदगावमधील एका गावातून या प्रकल्पाअंतर्गत उभारली जाणारी मार्गिका जाणार आहे. सध्या हा मार्ग 138 टक्के क्षमतेने चालतो. चार मार्गिका पूर्ण झाल्यावर अधिक प्रवासी गाड्या या मार्गावर धावू शकतील आणि भविष्यात नाशिक ते मुंबई थेट लोकल सेवा सुरू करण्याचा मार्गही मोकळा होईल अशी अपेक्षा आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES