केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ट्विस्ट! वकिलाच्या त्या युक्तीवादामुळे सिया तुरुंगातून बाहेर येणार?
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात ट्विस्ट आलं आहे. आरोपीचे वकिलामुळे सिया गोयल तुरूंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यातील लोणावळा इथल्या लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवाल याची हत्या झाली. आता केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवीन वळण आलंय. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात पोलिसांनी त्याची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीसह त्यांच्या एका मित्राला अटक केली आहे. आता हे प्रकरण कोर्टात उभं आहे. या प्रकरणात कोर्टात सिया गोयलचे वकील तिच्या जामिनासाठी जोरदार युक्तीवाद करत आहेत. वकिलाच्या युक्तीवादामुळे सिया गोयल तुरुंगा बाहेर येण्याची शक्यता आहे. यामुळे दुसरीकडे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
कोर्टात सिया गोयलच्या जामिनासाठी काय युक्तीवाद करण्यात आला?
मिळालेल्या माहितीनुसार सिया गोयलला जामीन मिळावा यासाठी तिच्या वकिलाने चार मुख्य मुद्दे मांडत जबरदस्त युक्तीवाद केला आहे. बचाव पक्षाने कोर्टात पहिला मुद्दा असा मांडला की, घटनास्थळाबाबत कुटुंबीयांनी घेतलेला आक्षेप - केतनच्या कुटुंबाने घटनास्थळाची पाहणी करुन तो तिथून पडू शकत नाही असं वक्तव्य केलं आहे. दुसरा मुद्दा तर संशयाच्या आधारे दिलेली तक्रार - यात वकिलांनी कोर्टात सांगितलं की, केतनच्या चुलत्याच्या मित्राने जेव्हा सांगितलं की सिया आणि चेतन यांचं लव्ह अफेयर आहे. यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली.
तिसरा मुद्दा वकिलाने मांडला की, दोन व्यक्तींमधील चॅट म्हणजे हत्येचे नियोजन नव्हे - पोलिसांनी सिया आणि चेतनचे फोन कॉल आणि चॅटिंग मोबाईलमधून काढले आहेत. या दोन्हीच्या आधारावर सियानेच हत्येचा कट रचला असं सिद्ध होऊ शकत नाही. दोन व्यक्तींमध्ये अनेक नको ते संवाद होतात, याचा अर्थ तो हत्येचा नियोजन नसतं.
तर शेवटचा मुद्दा होता की, स्वंतत्र्य पुराव्याचा अभाव - वकिलाने कोर्टात सांगितलं की, आरोपींच्या कथित जबावांशिवाय स्वतंत्र आणि सबळ पुरावे हे पोलिसांकडे नाहीत. तर केतनचा मृत्यू हा फोटो काढताना पाय घसरून झाला आहे, असा युक्तीवाद करत वकिलाने सियाला जामीन देण्याची मागणी कोर्टाकडे केली आहे.
सिया गोयलला जामीन मिळाला यासाठी विपुल दुशिंग आणि नितीन भालेराव हे वकील केस लढवत आहेत. त्यांनी कोर्टात म्हटलं की, सिया ही वयाने तरुण असून एखादा खटल्यासाठी बराच वेळ लागत असतो. तसंच पोलिसांकडे हत्येचा कट रचल्याचे कुठलेही सबळ पुरावे नसून त्यांनी ते कोर्टात अद्याप सादर केलेले नाही. त्यामुळे सिया गोयलला जामीन मिळाला पाहिजे.