SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कोल्हापुरात जीबीएसचा धोका, 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

कोल्हापूर शहराच्या जवळ असणाऱ्या कळंबा गावात जीबीएस या मज्जासंस्थेशी संबंधित आजाराचे चार संशयित रुग्ण आढळले आहेत.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 28, 2026, 10:10 IST | Updated: Nov 29, 2026, 09:44 IST
Image Credit: kolhapur GBS victim first death 11 year old student dies due to Guillain Barre Syndrome disease
Join

कोल्हापूर शहराच्या जवळ असणाऱ्या कळंबा गावात जीबीएस या मज्जासंस्थेशी संबंधित आजाराचे चार संशयित रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या आजारामुळं अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. राजवर्धन बुचडे असे या विद्यार्थ्याचे नाव असून, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू असताना काल त्याची प्राणज्योत मालवली. नोव्हेंबर 2026मध्ये कोल्हापूरात जीबीएसचा उद्रेक झाल्यापासून हा पहिला मृत्यू नोंदवण्यात आला आहे. त्यामुळं आरोग्य व्यवस्था अलर्ट झाली आहे.

कळंबा परिसरात जीबीएसचे सात रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. कनेरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने काल दिवसभर कळंबा गावात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण मोहीम राबवण्यात आली.

युद्धपातळीवर सुरू असलेल्या या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, तसेच कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासन आणि कळंबा ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे.

जीबीएस या आजारामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यानंतर मज्जासंस्थेवर देखील परिणाम होते. त्यामुळे रुग्णांना हाता-पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, चालताना त्रास होणे, हात-पायांची ताकद कमी होणे यासारखी लक्षणे दिसतात. काही रुग्णांमध्ये हा त्रास गंभीर स्वरूप धारण करू शकतो त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क होवून उपाययोजना सुरू केल्या आहेत.

जीबीएसची लक्षणे काय?

जीबीएस म्हणजे गुइलेन-बॅरे सिंड्रोमची सुरुवात सहसा पाय आणि हातांमध्ये मुंग्या येणे, सुन्नपणा आणि स्नायूंचा अशक्तपणा जाणवणे या लक्षणांनी होते, जी हळूहळू वरच्या दिशेने पसरू शकतात. हाता-पायाची बोटं, मनगटांमध्ये टोचल्यासारखे किंवा मुंग्या आल्यासारखे जाणवणे.

पायांमध्ये अशक्तपणा येऊन चालण्यास किंवा तोल सांभाळण्यास, जिने चढण्यास त्रास होणे. कधीकधी  कंबर, पाठ, मांड्या किंवा पायांमध्ये दुखणे किंवा क्रॅम्प येणे, जे रात्रीच्या वेळी अधिक जाणवू शकते, अशीही लक्षणे जाणवतात.

ही आहेत गंभीर लक्षणे

छातीचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे धाप लागणे किंवा सरळ झोपल्यावर श्वास घेणे कठीण होणे. चेहऱ्याचे स्नायू शिथिल होणे, बोलताना किंवा चावताना त्रास होणे, अथवा गिळण्यास अडथळा येणे.हृदयाचे ठोके वाढणे/कमी होणे, रक्तदाबात चढ-उतार किंवा लघवी/पचनावर नियंत्रण ठेवण्यात त्रास होणे अशी गंभीर लक्षणे आढळतात. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES