'...तर अध्यादेश मागे घेतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं'; 'गोकुळ'च्या निकालाआधीच हसन मुश्रीफांचं विधान
गोकुळवर महायुतीची सत्ता आली असून राजेश पाटील हे नवीन अध्यक्षपदी असणार आहे. निवडीसाठी मतदान सुरू असतानाच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी केलेल्या घोषणेमुळे एकच खळबळ माजली होती.
गेल्या 15 दिवसापासून गोकुळ दूध संघावर कोणाची सत्ता असणार यावरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. अखेर गोकुळची सत्ता ही महायुतीकडे आली असून राष्ट्रवादीचा पक्षाचा अध्यक्ष विराजमान झाले आहेत. राजेश पाटील हे गोकुळचे नवे अध्यक्ष असणार आहे. गोकुळ निवडणुकीचा निकालाआधी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं. ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वांचं भुवया उंचावल्यात.
हनस मुश्रीफ काय म्हणालेत?
गोकूळच्या बाबतीत माझ्याही काही भावना आहेत
पहिल्यांदा आमच्या आमच्या मध्ये फाजील आत्मविश्वास या परिस्थितीमध्ये ही निवडणूक झाली.
आपापसातल्या भांडणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या मंडळींनी केला.
सरकारचे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानले पाहिजे
वैधानिक संकट सोडवण्यासाठी अध्यादेश आणल्याचं सांगितलं आहे
दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार असेल तर अध्यादेश मागे घेतो म्हणून मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं
पण दुसऱ्याच दिवशी पेपरच्या पहिल्या पानावर मोर्चाच्या जाहिराती दिल्या आणि मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला
शुक्रवार आमचा कब्जा करायचा प्रयत्न नव्हता असं मुख्यमंत्री यांनी सांगितला आहे.
आम्हाला रेडा दाखवण्याचा प्रयत्न झाला की भाषण कोणी केले आपल्याला माहित आहे मुख्यमंत्र्यांचा अपमान झाला
आमचा अपमान जरी झाला तरी आम्ही उन्माद करण्याचा प्रयत्न करणार नाही
होय,मी चंद्रकांत पाटील,प्रकाश आंबेडकर सर्वच नेत्यांनी पुढाकार घेतला होता
प्रशासक आला असता तर 13 संचालकांना घरी जायची वेळ आली असती
मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत
बंटी पाटील या आधी तुम्ही दोन निवडणुका लढवल्या,मीही लढवल्या होत्या,आपण दोघे एकत्र आल्यावर सत्ता आली होती.
तुम्ही एवढे मोठे झाला नाही की माझा हात धराल
पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात तुम्ही ग्रह राज्यमंत्री झाला आणि बंटी आणि बबली जोडी झाली
मी नसतो तर तुम्ही मंत्री झाला नसता