• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /दरीत ढकललं की उडी मारली? कोल्हापुरातील इंजिनियर विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, दोघांच्या चॅट हिस्ट्रीमुळे...

दरीत ढकललं की उडी मारली? कोल्हापुरातील इंजिनियर विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, दोघांच्या चॅट हिस्ट्रीमुळे...

प्रियकराचा जबाब आणि त्यानंतर पोलिसांच्या हाती लागलेली मोबाईलमधील चॅट हिस्ट्रीमुळे कोल्हापुरातील इंजिनियर विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट निर्माण झालं आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 12, 2026, 04:06 PM IST|Updated: Oct 12, 2026, 04:08 PM IST
joinshare
दरीत ढकललं की उडी मारली? कोल्हापुरातील इंजिनियर विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट, दोघांच्या चॅट हिस्ट्रीमुळे...
Image Credit: दरीत ढकललं की उडी मारली?

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्रात केतन अग्रवाल हत्या प्रकरण अजूनही ताज असताना अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील शिवडाव - नाईकवाडीतील या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. लग्नाच्या काही दिवसांपूर्वी सियाने होणाऱ्याला नवऱ्याला पुण्याजवळील लोहगडावरून ढकललं. या घटनेत प्रेयसीचं लग्न दुसऱ्याशी ठरल्याचा रागात तिला दरीत ढकलून दिल्याचा आरोपीखाली प्रियकराला अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणाची चौकशी करताना प्रियकराचा जबाब आणि चॅट हिस्ट्रीमुळे एक वेगळीच वळण लागलंय.

प्रियकराचे नाव श्रीपाद दिनकर वडार आहे. तर मृत तरुणी ही इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी तरन्नुम नाईक असं तिचं नाव होतं. ती गरगोटी इथे आपल्या आजीसोबत राहत होती. तरन्नुमला श्रीपादने 1000 फूट खोल दरीत ढकललं असं प्रथमदर्शनी समोर आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीपदा आणि तरन्नुम हे एकाच परिसरात राहत होते. तरन्नुम नाईकला श्रीपादने  9 ऑक्टोबरला शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भेटायला बोलावले. त्यानंतर तो तिला नाईकवाडी धबधब्यावर घेऊन गेला. तिथे तरन्नुमने त्याला सांगितलं की, तिचे लग्न ठरले आहे आणि त्यांचे प्रेमप्रकरण आता पुढे चालू शकत नाही. या रागातून त्याने प्रियसीला दरी ढकलं, असं समजलं. त्यानंतर धक्कादायक म्हणजे दुसऱ्या दिवशी श्रीपाद स्वत: पोलीस स्टेशनला आला आणि सांगितलं की, सेल्फी काढताना तिचा पाय घसरून ती पडली. पण पोलिसांनी श्रीपादची चौकशी केल्यानंतर त्याने धक्कादायक दावा केला आहे.

आरोपी आणि प्रियकर श्रीपदा याने पोलिसांना सांगितलं की, त्या दोघांचं गेल्या साडेपाच वर्षांपासून प्रेमप्रकरण होतं. त्या दोघ एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे. पण तरन्नुमच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवल्यामुळे दोघही अस्वस्थ झाले होते. अशा परिस्थिती काय करावं हे दोघांना समजत नव्हतं. अशा स्थितीत त्या दोघांनी ठरवलं की आपलं आयुष्य संपवायचं. म्हणून ते दोघे नाईकवाडी धबधब्यावर गेले होते. तिथे तरन्नुमने दरीत उडी मारली पण ऐनवेळी माझी हिम्मत झाली नाही. आरोपीच्या या दाव्याबद्दल पोलिसांना अद्याप काही पुरावा हाती लागलेला नाही.

पणदुसरीकडे पोलिसांनी दोघांच्या मोबाईलमधील चॅट हिस्ट्री तपासली तेव्हा यात दोघांनी आत्महत्येबद्दल काही प्लॅनिंग केलं होतं, असे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे पोलीस श्रीपादची कसून चौकशी करत आहेत. 

Add Zee News as a Preferred Source