भीषण अपघातात धुळ्यामधील 9 जणांचा जागीच मृत्यू; एका हट्टामुळे 10 वर्षांचा चिमुकला वाचला, नेमकं झालं काय?
राजस्थानच्या कोटामध्ये झालेल्या भीषण अपघातात आई - वडील बहीण सगळेच डोळ्यात देखत गेले. पण 10 वर्षांचा चिमुकला एका हट्टामुळे वाचला.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आमराळे इथले पवार कुटुंब राजस्थानच्या कोटामधील खाटूश्यामजींचे दर्शन घेऊन परताना त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. यात अपघातात एकाच पवार कुटुंबातील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. पण याच कारमध्ये असलेल्या 10 वर्षीय जगदीश वाचला. पण त्याने या अपघातात त्याचे आई वडील आणि बहीण यांचा मृत्यू झाल्यांने तो पोरका झाला आहे.
त्या रात्री काय घडलं होतं?
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील आमराळे इथले पवार कुटुंबातील 36 जण राजस्थानमधील कोटा इथल्या खाटूश्याम बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. 20 नोव्हेंबरला खाटूश्याम बाबा यांची जयंती होती. त्यानिमित्ताने तीन गाड्या करून हे पवार कुटुंब गेले होते. दर्शनानंतर घराकडे परताना रविवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ क्रूझर गाडीला अपघातात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर क्रूझर गाडी जाऊन जोरदार आदळली. यात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातग्रस्त गाडीमध्ये एकूण 16 जण होतं. यातील 9 शिवाय इतर लोक जखमी झाले. या जखमीमध्ये एक होता, तो 10 वर्षीय चिमुकला.
हेसुद्धा वाचा - नगरसेवकाच्या मुलाचा भररस्त्यात 'रेस'चा जीवघेणा थरार, शेतकरी दाम्पत्यासाठी ठरला काळ; थरारक CCTV
10 वर्षांचा चिमुकला कसा वाचला?
या भीषण अपघात आणि क्रूझर गाडीचा भुगा झाला अशातून तो 10 वर्षांचा चिमुकला एका हट्टामुळे वाचला. झालं असं की, जगदीश प्रवास सुरु झाला तेव्हा गाडीच्या समोरच्या बाजूला आई- वडिलांसोबत समोर बसला होता. त्यानंतर त्याने मागे जाऊन बसण्याचा हट्ट केला. त्याच्या हाच हट्ट्यामुळे त्याला जीवनदान मिळालं. कारण तो मागे जाऊन बसल्यानंतर काही वेळातच हा अपघात झाला. या अपघातात त्याने आई - वडील आणि बहीण यांचा मृत्यू झाला. जगदीशचा जीव थोडक्यात वाचला. पण तो या अपघातामुळे पोरका झाला.
दरम्यान या 9 जणावर अंत्यसंस्कार मध्यरात्री करण्यात आले. सर्वांचा एकत्रच दफनविधी करण्यात आला. या अपघातमुळे धुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. सर्व मृतदेह गावात आल्याबरोबर एकच आक्रोश पाहायला मिळाला. नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. मध्यरात्रीच्या सुमारास नऊही मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सजवलेल्या ट्रॅक्टरवर सर्वांचे पार्थिव ठेवून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने पांचकृषि तील ग्रामस्थ उपस्थित होते. पालकमंत्री जयकुमार रावल यांनीही या दुःखद प्रसंगी उपस्थित राहून शोकाकुल कुटुंबीयांचे सांत्वन केले. दरम्यान, या भीषण अपघातातून बचावलेल्या दहा वर्षीय बालकाच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी स्वीकारली आहे. दुःखाच्या या डोंगरात बालकाच्या भविष्याला आधार देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.