SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

27 ऑक्टोबर रोजी किती आहे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या रेट्स

LPG Gas Cylinder Price Today : 27 ऑक्टोबर सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या ताज्या किंमती जाहीर केल्या आहेत. तेव्हा देशातील प्रमुख शहरातील LPG गॅस सिलेंडरच्या किंमती माहित करून घ्या.

Reported By pooja pawar Written By pooja pawar
Published: Oct 27, 2026, 10:56 AM IST | Updated: Oct 27, 2026, 11:18 AM IST
Image Credit: 27 ऑक्टोबर रोजी किती आहे घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती?
Join

LPG Gas Cylinder Price Today 27 october 2026 : दिवाळीच्या दिवसांमध्ये घरी खमंग पदार्थ करण्याची लगबग सध्या सर्व घरांमध्ये दिसून येते. देशातील अनेक घरांमध्ये तसेच उपहारगृहांमध्ये शिजवण्यासाठी LPG गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. घरगुती गॅस सिलेंडर हे 14.2 किलोग्रामचे असतात तर व्यावसायिक गॅस सिलेंडर 19 किलोग्रामचे असतात. दररोज सकाळची 6 वाजता सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती जाहीर करतात. तेव्हा तुमच्या शहरातील आजच्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती जाणून घेऊयात.

तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती (14.2 किलोग्राम):

दिल्ली          939.50 रुपये 
नोएडा          939.50 रुपये 
मुंबई            941.50 रुपये 
कोलकाता    968.00 रुपये 
पटना          1,031.50 रुपये 
बेंगलुरु        944.50 रुपये 
इटावा         973.50 रुपये 
बिजनौर      963.00 रुपये 
अलीगढ़      960.00 रुपये

हेही वाचा : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये झाले बदल? 27 ऑक्टोबर रोजी किती आहेत इंधनाचे दर

तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती (19 किलोग्राम):

दिल्ली        2,810.00 रुपये 
नोएडा       2,747.50 रुपये 
मुंबई         2,764.50 रुपये 
कोलकाता  2,954.00 रुपये 
पटना        3,100.50 रुपये 
बेंगलुरु      2,764.00 रुपये 
इटावा       2,890.00 रुपये 
बिजनौर    2,852.00 रुपये 
अलीगढ़    2,835.00 रुपये 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES