LPG गॅस सिलेंडर बुक करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजच्या घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती
LPG Gas Cylinder Price Today : सणासुदीच्या काळात घराघरात फराळाचे पदार्थ बनवले जातात. त्यामुळे साहजिकच LPG गॅस सिलेंडर वापरकर्त्या घरात सिलेंडरची मागणी वाढते. तेव्हा 24 ऑक्टोबर 2026 रोजी घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या ताज्या किंमती जाणून घ्या.
LPG Gas Cylinder Price Today : सणासुदीच्या काळात गॅस सिलेंडरचा वापर वाढतो. देशातील अनेक घरांमध्ये अन्न शिजवण्यासाठी LPG गॅस सिलेंडर वापरतात. 24 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 6 वाजता सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी 14.2 किलोग्रामच्या घरगुती आणि 19 किलोग्रामच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या ताज्या किंमती जाहीर केल्या आहेत. तेव्हा तुमच्या शहरातील LPG गॅस सिलेंडरचे ताजे दर जाणून घ्या. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मात्र व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती मात्र 62.50 रुपयांनी वाढल्या होत्या.
तुमच्या शहरातील घरगुती गॅस सिलेंडरच्या (14.2 किलोग्राम) किंमती :
दिल्ली 939.50 रुपये
नोएडा 939.50 रुपये
मुंबई 941.50 रुपये
कोलकाता 968.00 रुपये
पटना 1,031.50 रुपये
बेंगलुरु 944.50 रुपये
लखनऊ 979.50 रुपये
हैदराबाद 994.00 रुपये
जयपुर 945.50 रुपये
हेही वाचा : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! पूजा, दिवाळी आणि छठ सणानिमित्त विशेष गाड्यांची घोषणा
तुमच्या शहरातील व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (19 किलोग्राम) किंमती :
दिल्ली 2,810.00 रुपये
नोएडा 2,747.50 रुपये
मुंबई 2,764.50 रुपये
कोलकाता 2,954.00 रुपये
पटना 3,100.50 रुपये
बेंगलुरु 2,764.00 रुपये
लखनऊ 2,932.50 रुपये
हैदराबाद 3,065.00 रुपये
जयपुर 2,839.00 रुपये
दर महिन्याला किंमती बदलतात :
भारतात एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरच्या किंमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सुधारित केल्या जातात. ही सुधारणा व्यावसायिक आणि घरगुती अशा दोन्ही प्रकारच्या सिलिंडरसाठी लागू होते. इंडियन ऑइल (IOCL), बीपीसीएल (BPCL) आणि एचपीसीएल (HPCL) यांसारख्या सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सकाळी 6: 00 वाजता नवीन किंमती जाहीर करतात. या किंमती आयात सममूल्य किंमती, चलन विनिमय दर आणि इतर विविध जागतिक घटकांच्या आधारे निश्चित केल्या जातात.