• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /Maharashtra Vidhan Parishad Graduate Constituency: पुणे, नागपूर आणि छ. संभाजीनगरमध्ये पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? कोणाविरुद्ध कोण रिंगणात?

Maharashtra Vidhan Parishad Graduate Constituency: पुणे, नागपूर आणि छ. संभाजीनगरमध्ये पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? कोणाविरुद्ध कोण रिंगणात?

तीन पदवीधर मतदारसंघांतून एकूण 126 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कोणत्या तीन जागांसाठी या निवडणुका झाल्यात आणि कुठून कोण उभं आहे ते पाहूयात तसेच कोणात कुठे चुरशीची लढाई होण्याची शक्यता आहे ते ही जाणून घेऊयात...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 27, 2026, 06:58 AM IST|Updated: Oct 27, 2026, 07:22 AM IST
joinshare
Maharashtra Vidhan Parishad Graduate Constituency: पुणे, नागपूर आणि छ. संभाजीनगरमध्ये पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? कोणाविरुद्ध कोण रिंगणात?
Image Credit: पदवीधरमध्ये कोण मारणार बाजी?

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण तीन पदवीधर मतदारसंघांसाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले असून आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत तीन पदवीधर मतदारसंघांतून एकूण 126 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कोणत्या तीन जागांसाठी या निवडणुका झाल्यात आणि कुठून कोण उभं आहे ते पाहूयात...

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून एकूण 38 उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात होते. मात्र असं असलं तरी प्रतिष्ठाचा विषय बनवलेल्या या मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी आणि भाजपचे माजी आमदार सुधार कोहळे यांच्यात मुख्य लढत आहे. भाजपचे अनिल सोले यांनीही अर्ज भरला होता, परंतु नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोले यांची घरी जाऊन भेट घेतल्यानंतर त्यांनी माघार घेतली आणि भाजपचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांना पाठिंबा जाहीर केला. नेमके निवडणुकीच्या रिंगणात आता तीन मुख्य उमेदवार कोण आहेत ते पाहूयात...
* सुधाकर विठ्ठलराव कोहळे – भाजप (महायुती)
* अभिजीत गोविंदराव वंजारी – काँग्रेस (महाविकास आघाडी - विद्यमान आमदार)
* प्राध्यापक नितेश कराळे (कराळे सर) – अपक्ष

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ

विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यातील पदवीधर मतदारसंघात एकूण 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असून इथे बंडखोरी करुन महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील मोदीसुद्धा निडवणुकीच्या रिंगात आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार भाजपा उमेदवाराबरोबरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरूद्धही लढला आहे. या मतदारसंघातील तीन प्रमुख
- डॉ. स्मिता योगेश जाधव – भाजप (महायुती)
- हर्षदा देशमुख-जाधव – राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष (महाविकास आघाडी)
- सुनील मोदी – शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (बंडखोर/स्वतंत्र)

छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघ

या मतदारसंघातून एकूण 41 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं आहे. मात्र इथेही पुण्याप्रमाणे तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. यामध्ये अजित पवार गट, शरद पवार गट आणि ठाकरे गट यांच्यात सामना पाहायला मिळणार असून कोण बाजी मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

* सतीश भानुदास चव्हाण – राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार पक्ष (महायुती - विद्यमान आमदार)
* प्रतापसिंह पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्ष (महाविकास आघाडी)
* दिलीप घुगे – शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Maharashtra News