सगळ्यात रंगतदार लढत पुण्यात! शिंदे नाशिकचा वचपा पुण्यात काढणार? भाजपाला मित्रपक्षाचेच आव्हान; निवडणुकीच्या रिंगणात कोणाविरुद्ध कोण?
शिक्षक मतदारसंघांच्या या निवडणुकीत एकूण 55 उमेदवार रिंगणात आहेत. पुणे विभागातून 30 उमेदवार आणि अमरावती विभागातून 25 उमेदवार रिंगणात आहेत. महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्षांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. कोणाविरुद्ध कोण आहे रिंगणात पाहूयात...
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे आणि अमरावती या दोन शिक्षक मतदारसंघांचा निकाल आज लागणार आहे. यासाठी 23 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं. सकाळी आठ वाजल्यापासून या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. शिक्षक मतदारसंघांच्या या निवडणुकीत पुणे विभागातून 30 उमेदवार आणि अमरावती विभागातून 25 उमेदवार रिंगणात आहेत. महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्षांमध्ये प्रमुख लढत पाहायला मिळत आहे. या मतदारसंघांमधून कोणी निवडणूक लढवली आणि कोणाकोणात चुरशीची लढाई होणार आहे ते पाहूयात...
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ
पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्येच अंतर्गत चुरस पाहायला मिळणार असून एकूण 30 उमेदवार पुण्यातून नशीब आजमावत आहेत. महायुतीमध्ये असलेल्या मतभेदांमुळे गाजलेल्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार बाजी मारतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये शिंदे काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या निवडणुकीतील भाजपाच्या बंडखोर उमेदवारामुळे झालेल्या दगाफटक्याचा हिशोब बरोबर करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कोणत्या पक्षातून कोण ही निवडणूक लढलं आहे ते पाहूयात... * कौस्तुभ मुरलीधर गावडे – भारतीय जनता पार्टी (महायुतीचे अधिकृत उमेदवार) * जयंत आसगावकर – काँग्रेस (महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार - विद्यमान आमदार) * सचिन सानप – शिवसेना - (एकनाथ शिंदे गट पुरस्कृत उमेदवार) * दत्तात्रय सावंत – अपक्ष (माजी आमदार / बंडखोर उमेदवार)
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ
पुण्याबरोबरच अमरावतीमध्येही शिक्षक मतदारसंघाचसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी महायुतीचे विद्यमान आमदार विरुद्ध महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्येच तिरंगी तसेच चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. या निवडणुकीमधील अमरावतीतील 25 उमेदवारांपैकी चार महत्त्वाचे उमेदवार कोणते ते पाहूयात... * किरण रामराव सरनाईक – शिवसेना - एकनाथ शिंदे गट (महायुतीचे अधिकृत उमेदवार - विद्यमान आमदार) * अदिती पोहरे – काँग्रेस (महाविकास आघाडीचे उमेदवार) * दत्तात्रय लहाने – शिवसेना - )उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार) * दिलीप कडू – )अपक्ष/बंडखोर उमेदवार)
ही निवडणूक का घेतात? कोण मतदान करतं?
शिक्षक मतदारसंघाचे आमदार हे थेट राज्यातील शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतात. राज्यघटनेच्या कलम 171 नुसार या विशेष आमदारांची निवड केली जाते. शिक्षक मतदारसंघातील आमदार हे सर्वसामान्य नागरिक निवडून देत नाहीत. ज्या शिक्षकांनी माध्यमिक शाळा किंवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक संस्थेत किमान तीन वर्षे शिक्षक म्हणून काम केले आहे आणि ज्यांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे, तेच शिक्षक या निवडणुकीत मतदान करून आपले प्रश्न मांडणारा प्रतिनिधी म्हणून या आमदारांना निवडून देतात.
मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.