• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /महाराष्ट्रात दोन नवीन अभयारण्ये! तर पुणे, ठाणे, पालघरसह 'या' जिल्ह्यांसाठीही महत्त्वाची घोषणा

महाराष्ट्रात दोन नवीन अभयारण्ये! तर पुणे, ठाणे, पालघरसह 'या' जिल्ह्यांसाठीही महत्त्वाची घोषणा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या दोन क्षेत्रांना अभयारण्य घोषित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 27, 2026, 02:29 PM IST|Updated: Oct 27, 2026, 02:33 PM IST
joinshare
महाराष्ट्रात दोन नवीन अभयारण्ये! तर पुणे, ठाणे, पालघरसह 'या' जिल्ह्यांसाठीही महत्त्वाची घोषणा
Image Credit: Maharashtra Wildlife Board

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भीमाशंकर जंगल गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. टॉरंटच्या कथित प्रकल्पासाठी भीमाशंकरच्या जंगलातील झाडे कापली जाणार असल्याचा दावा केला जातोय. यावरुन राजकारण तापलं आहे. विरोधकांसह पर्यावरणवादी आणि स्थानिकांनी याचा विरोध केलाय. भीमाशंकर जंगल वादाच्या केंद्रस्थानी असतानाच महाराष्ट्रातील दोन वनक्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर, राज्यातील पुणे, ठाणे, पालघर, रायगडमधील 14 क्षेत्रांचे प्रस्तावही मंजूर करण्यात आले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील रानम्हशींसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोलामाको संवर्धन राखीव क्षेत्र आणि तानसा वन्यजीव अभयारण्य क्षेत्राजवळील नवीन विस्तारित तानसा येथील वनक्षेत्रांना वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्य जीव मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

पुणे, रायगड, नाशिक, नंदुरबार, ठाणे, पालघर, चंद्रपूर जिल्ह्यांतील 14 संवर्धन राखीव क्षेत्रांच्या प्रस्तावांना मान्यताही देण्यात आली. यामध्ये पुणे आणि रायगड जिल्ह्यातील वेल्हे मुळशी, पुणे जिल्ह्यातील भोरगिरीगड, नाशिकमध्ये दिंडोरी, सुरगणा व ताहाराबाद, नंदुरबारमधील चिंचपाडा, रायगडमधील अलिबाग व घेरा मानिकगड, पुणे जिल्ह्यातील - लोणावळा, ठाण्यातील गुमतारा, - पालघरमधील जव्हार, आशेरीगड - व धामणी आणि चंद्रपूरमधील एकारा या राखीव क्षेत्राचा समावेश आहे.

नवीन विस्तारित तानसा वन्यजीव अभयारण्याजवळील ओगदा, खोडदे, तिरमाळ, पाचघर, फणसाड आणि आमले या सहा गावांतील 588 हेक्टर महसुली व खासगी क्षेत्र समाविष्ट करण्याच्या प्रस्तावास मंडळाने मान्यता दिली.

भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्यातील 100.139 चौरस किमी आणि छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडी पक्षी अभयारण्यातील 255.79 चौरस किमी क्षेत्र धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास म्हणून घोषित करण्यास मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश

अभयारण्यातील धरणांची दुरुस्ती, पुनर्वसन आणि गाळ काढण्याच्या कामांसाठी प्रत्येक वेळी स्वतंत्र्य मान्यता घेण्याऐवजी व्यवस्थापन आराखाड्यात सुधारणा करुन 3 महिन्यात नवीन नियमावली तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. संरक्षित क्षेत्रे, पर्यावरण संवेदनशील क्षेत्रे आणि व्याघ्र भ्रमणमार्गातील सिंचन, आरोग्य, पाणीपुरवठा, पूल, रस्ते, वीजवाहिनी आदींसह इतर पायाभूत सुविधांच्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. प्रादेशिक वन विभाग, वन विकास महामंडळाच्या व्यवस्थापनाखाली असलेली क्षेत्रे वन्यजीव शाखेकडे देण्याबाबत कर्मचारी समायोजन, प्रतिनियुक्ती आणि रिक्त पदांचा अभ्यास करून महिन्यात निर्णयासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra News
Maharashtra Tourism