SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'विलिनीकरणाच्या....', रुग्णालयात शरद पवारांसोबत नेमकी काय चर्चा झाली? प्रफुल्ल पटेलांनी अखेर केला खुलासा '10 तारखेनंतर...'

शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात रुग्णालयात झालेली चर्चा आणि त्यानंतर सुनील तटकरे यांनी केलेल्या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 08, 2026, 15:34 IST | Updated: Nov 08, 2026, 15:44 IST
Image Credit: रुग्णालयात शरद पवारांसोबत नेमकी काय चर्चा झाली? प्रफुल्ल पटेलांनी सांगितलं
Join

राष्ट्रवादी काँग्रेसचे (SP) अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात दाखल असताना प्रफुल्ल पटेल त्यांच्या भेटीसाठी पोहोचल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण सुरु झालं. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेक कयास लावण्यात आले. त्यात 10 नोव्हेंबरचा उल्लेख असल्याने त्याबाबत अनेक दावे-प्रतिदावे होऊ लागले होते. दरम्यान आता स्वत: प्रफुल्ल पटेल यांनीच याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ते गोंदियात माध्यमांशी संवाद साधत होते.

"दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा आम्ही हॉस्पिटलमध्ये करणार आहोत का?," असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आहे. पवार साहेबांची स्थिती चांगली राहो ही संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे असंही ते म्हणाले आहेत. तसंच 10 तारखेच्या पूर्वी मी गोंदियाला असतो, त्यानंतर येऊन मी मुंबईला आल्यावर आपल्याशी चर्चा करतो असे सांगितले," असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.  

हे ही वाचा - पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात तटकरेंचं मोठं विधान, अजित पवारांचा उल्लेख करत म्हणाले '10 तारखेला...'

"शरद पवार हे माझ्यासाठी आदरणीय आहेत. मी अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांना भेटायला गेलो होते. 10 तारखेनंतर परत येऊन भेटणार असं त्यांच्याशी बोलणं झालं. विलिनीकरणासंदर्भात हॉस्पिटलमध्ये कुठलीही चर्चा झाली नाही," असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.  महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या सोबत राहणार त्यांना दिलासा देणार असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

तटकरेंच्या विधानामुळे उधाण

अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. दादांचा अपघात झाला नसता तर विलिनीकरण झालं असतं असा दावा सुनील तटकरेंनी केला आहे. सुनील तटकरे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. मुख्यमंत्री फडणवीसांनी सावध भूमिका घेतलीय.. तर महेंद्र थोरवे, रुपाली ठोंबरे, संजय राऊत आणि रोहित पवारांनी या मुद्द्यावरून वेगवेगळे सवाल उपस्थित केलेत.

फडणवीसांची स्पष्ट भूमिका

अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या एकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. मात्र या चर्चेवरून आता नेत्यांमध्येच जुंपलीय. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत आमच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र पक्ष आहेत त्यांच्या पक्षांचे निर्णय त्यांनीच घ्यायचे आहेत.
त्यांच्या अंतर्गत निर्णयांवर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. मात्र दोन्ही पक्षांना एकत्र यायचं असेल किंवा विलीनीकरणाबाबत चर्चा करायची असेल तर भाजपला विश्वासात घ्यावं लागेल. कारण एनडीएमध्ये भाजप सर्वात मोठा भागीदार आहे असंही फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान सुनील तटकरेंनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादीतच आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत... अजित पवार हयात असताना विलीनीकरणाच्या 13 बैठका झाल्या. मग या बैठकांमध्ये सुनील तटकरे का नव्हते? असा सवाल आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थित केला आहे. तटकरेंचा हा सगळा खटाटोप अर्थखात्यासाठी सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान रुपाली ठोंबरेंनीही तटकरेंना लक्ष्य केलंय. तटकरेंना 9 महिन्यांनंतर आताच कंठ का फुटला? इतके दिवस ही माहिती पक्षापासून का लपवली? असे सवाल त्यांनी उपस्थित केलेत. सुनेत्रा पवार यांना अडचणीत आणण्यासाठीच तटकरेंचं हे विधान आहे का? अशी शंकाही ठोंबरेंनी व्यक्त केलीय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES