SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

वडील नाहीत, भाऊ दहावीत तर कापूस हातचा गेला पण...; अभिनेता प्रवीण तरडेंनी घेतली पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणीच्या शिक्षणाची जबाबदारी

झी २४ ताससोबत प्रवीण तरडे सोलापूरमधील पाथरीमध्ये दिवाळी साजरा करण्यासाठी पोहोचले. तिथे त्यांनी एका तरुणाच्या शिक्षणाची पू्र्ण जबाबदारी उचलली.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 09, 2026, 18:53 IST | Updated: Nov 10, 2026, 16:45 IST
Image Credit: utsav bandhilkicha
Join

दिवाळी म्हटलं की, आनंद, प्रकाश आणि उत्साह...पण यंदा महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये दिवाळी आनंद काय दारात पणती लावण्यासाठीही तेल नाही. हो, दुष्काळ, पाणीटंचाई आणि आर्थिक अडचणीत बळीराजा सापडला आहे. महाराष्ट्रातील सण हे शेतीशी जोडलेले आहेत. दिवाळी हा सणदेखील शेती आणि शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण...पण हा सण साजरा करण्यासाठी काय घरातील दैनंदिन जीवनातील गरजा असो किंवा भविष्यातील गोष्टींची चिंता या लोकांना त्रस्त करत आहे. अशातच यंदा झी २४ तासने उत्सव बांधिलकीचा या उपक्रमातून शेतकरी कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण आणण्यासाठी आम्ही थेट बळीराजाच्या दारी गेलो.

झी २४ तासच्या टीमसोबत मराठी कलाकराही सहभागी झाले होते. जेव्हा झी २४ तासच्या टीम एक एक पाडाव पोहोचत होती, तिथल्या लोकांच्या समस्या ऐकून डोळे पाणावले. अशाच सोलापुरातील पाथरीमध्ये २४ तासच्या टीमसोबत अभिनेते प्रवीण तरडे पोहोचले. तिथल्या एका घरी झी २४ तासाचे संपादक कमलेश सुतार आणि अभिनेते प्रवीण तरडे गेले. घरात डोकवलं तर साध पत्र्याचं घर आणि घरात तरुण मुलगी, आई आणि दहावीत शिकणारा मुलगा...

मुलीशीशी जेव्हा प्रवीण तरडे यांनी संवाद साधला, तेव्हा मनाच्या कोपऱ्यात वेदना झाल्यात. ती तरुणी आज पोलीस भरतीसाठी तयारी करत आहे. वडील गेल्यानंतर तिने निर्धार केला की आई - भावाची जबाबदारी घेण्यासाठी आपण पोलिसात भरती होऊ या. लहानपणापासून शेतात राबल्यामुळे अंगाने मजबूत असल्याने तिने पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. वडील नसल्यामुळे तीन एकर शेतीची जबाबदारी आईवर आली. पण दुष्काळ, पाणीसंकट, पावसाचा लपंडाव यामुळे शेतातील कापूसही हिरावून गेला.

लेकीला शिक्षण आणि पोलीस भरतीसाठी लाख सव्वा लाख लागणार आहे, पण ते आणणार तरी कुठून...या विवंचनेत असताना अभिनेता प्रवीण तरडे यांनी त्या तरुणीच्या पुढील पूर्ण शिक्षणाची जबाबदारी उचलली. झी 24 तासच्या या उपक्रमातून प्रवीण तरडेंसह उत्सव बांधिलकीचा जपत त्यांच्या दारात आणि तरुणीच्या आयुष्यात प्रकाश केला. या शेतकरी कुटुंबाची दिवाळी थोडी का होईना आनंदी, प्रकाशमय करण्याचा प्रयत्न झी 24 तासने केला. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES