• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् घडलं भलतंच, दोन मित्रांसोबत आलेल्या जिज्ञेशसोबत काय झालं?

दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् घडलं भलतंच, दोन मित्रांसोबत आलेल्या जिज्ञेशसोबत काय झालं?

पुणे येथून तिघेजण किल्ले राजगड पाहण्यासाठी आले होते. किल्ला चढताना 35 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला. जिज्ञेश सदाशिव खंडाळकर असे मृत पर्यटकाचे नाव आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 11, 2026, 01:25 PM IST|Updated: Oct 11, 2026, 01:31 PM IST
joinshare
दुपारच्या रणरणत्या उन्हात राजगड पाहायला गेला अन् घडलं भलतंच, दोन मित्रांसोबत आलेल्या जिज्ञेशसोबत काय झालं?
Image Credit: Rajgad Fort

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ला चढताना 35 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला. जिज्ञेश सदाशिव खंडाळकर असे मृत पर्यटकाचे नाव आहे. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास पाल बुद्रुक मार्गावर ही घटना घडली.

पुण्यातील हडपसरच्या भेकराईनगरमध्ये राहणारे जिज्ञेश हे दोन मित्रांसह किल्ला पाहण्यासाठी आले होते. चढाईदरम्यान चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  पुणे येथून तिघेजण किल्ले राजगड पाहण्यासाठी आले होते. पद्मावती माची परिसरात आल्यानंतर त्यातील जिज्ञेश याला थकवा जाणवू लागल्याने त्याला त्याच ठिकाणी बसवून इतर दोघे जण बालेकिल्ल्याकडे गेले. काही वेळानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. गडावर बसलेल्या इतर पर्यटकांनी त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास वेल्हे पोलिस करीत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर आहे. पुणे जिल्ह्यातही तापमानाचा पारा चढतच आहे. ऑक्टोबर हिटची तीव्रता वाढत असताना हवामान विभागाने दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे असं अवाहनही केलं आहे. त्यामुळं दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडू नका. तसंच, डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहा.

पुण्यातील आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगर येथील समुद्रात बुडून मृत्यू

आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा दिवेआगरच्या समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना 1 ऑक्टोबर रोजी घडली होती. आळंदी येथील 'विनर्स अकॅडमी फॉर 11 वी-12वी सायन्स'चे विद्यार्थी होते. समुद्रात भरतीची वेळ असताना पाण्यात उतरलेल्या 8 विद्यार्थ्यांचा नाकातोंडात पाणी आणि वाळू गेल्याने करुण अंत झाला. जीवरक्षक आणि स्थानिकांनी अवघ्या पाच मिनिटांत सर्वांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
Pune News