• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /सुनील तटकरेंना मोठा धक्का, होमग्राउंडवर राष्ट्रवादीला खिंडार, विश्वासू सहकाऱ्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

सुनील तटकरेंना मोठा धक्का, होमग्राउंडवर राष्ट्रवादीला खिंडार, विश्वासू सहकाऱ्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 17, 2026, 08:28 IST|Updated: Nov 17, 2026, 08:30 IST
joinshare
सुनील तटकरेंना मोठा धक्का, होमग्राउंडवर राष्ट्रवादीला खिंडार, विश्वासू सहकाऱ्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश
Image Credit: Sunil Tatkare Political Setback in Raigad 850 Party workers join eknath shinde Shivsena bharat gogawale

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल!  फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

पुणे, मुंबई नाही तर महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील लोक अव्वल! फॅन्सी नंबरसाठी तब्बल 19 कोटी 84 लाख रुपये मोजले

2

नवी मुंबईतील तरुणाने एकाचवेळी खरेदी केल्या 3 महागड्या कार; एवढ्या पैशात 1 कोटीचे 50 फ्लॅट विकत घेता येतील

3

टायफॉइड झाल्यावर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या महत्त्वाची लक्षणे

4

इमर्जिंग आशिया कप 2026 पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार? कशी असेल भारताची Playing 11

5

NBCC ने सुधारली आपली चूक, 49 फ्लॅट्सबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं केलं मान्य; आपल्या जोखमीवर लिलावात सहभागी होण्याचं आवाहन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सुनील तटकरे यांचे होमग्राउंड अशी ओळख असलेल्या रोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर, रोहा पंचायत समितीचे विद्यमान सदस्य सुरेश मगर तसेच आप्पा देशमुख यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

रोह्यातील राम मारुती चौकात पालकमंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री भरत गोगावले यांनी  खासदार सुनील तटकरे यांना मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे.

राष्ट्रवादीचे पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष आणि सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रमोद म्हसकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याने हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो. विशेष म्हणजे, सुनील तटकरे यांचे प्रभावक्षेत्र मानल्या जाणाऱ्या रोह्यातच हा पक्षप्रवेश झाला असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष आता शिगेला पोहोचल्याचे म्हटले जाते.

श्रीवर्धनमध्येही राष्ट्रवादीला खिंडार

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या आणखी काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मंत्री आदिती तटकरे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे. गेली 15 वर्षे श्रीवर्धन तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे दर्शन विचारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. कार्यकर्त्यांच्या या पक्षप्रवेशामुळं श्रीवर्धन शहरासह ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला होता.

'राष्ट्रवादीशी मैत्री जरा लांबूनच ठेवा'

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र , जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी राष्ट्रवादीशी मैत्री जपताना सावध राहण्याचा सल्ला शिवसेनेच्या नेत्यांना दिला आहे. शेकापची आज झालेली अवस्था पाहता शिवसेनेचा शेकाप होऊ देऊ नका, त्यासाठी राष्ट्रवादीशी संबंध जरा लांबच ठेवा, असे सूचक विधान त्यांनी केले आहे

दरम्यान, माणगावच्या प्रवेश सोहळ्यात शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरेंवर टोकाची टीका केली होती. मात्र आता  महेंद्र दळवींनी सुनील तटकरेंना उदंड आयुष्य लाभो आणि तटकरे 100 वर्ष जगावे, अशा शुभेच्छा दिल्यात. पुढचा प्रवास त्यांनी याची देही याची डोळा अनुभवावा, असं महेंद्र दळवी म्हणालेत. याआधी माणगावच्या सभेत तटकरेंवर बोलताना महेंद्र दळवींची जीभ घसरली होती. त्यानंतर आता त्यांनी तटकरेंना या शुभेच्छा दिल्या आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sunil Tatkare
Bharat Gogawale
shiv sena