SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भंडाऱ्यात रात्रीच्या वेळी दोन विद्यार्थिनींना एसटीमधून खाली उतरवलं, नेमकं काय घडलं?

भंडाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना एसटीमधून खाली उतरवण्यात आलं.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 15, 2026, 01:41 PM IST | Updated: Nov 15, 2026, 01:43 PM IST
Image Credit: ST bus Bhandara
Join

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळाच्या बस म्हणजे लाल परी धावतात. गावागावाला जोडणाी ही लालपरी सर्वसामान्यांसाठी आधार आहे. पण एका एसटी बसमधील धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंढरीहून भंडारातून निघालेल्या एसटी बसमधून रात्रीच्या वेळी दोन विद्यार्थीनींना रोहा गावातच उतरवण्यात आलं. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही घटना पालकांना आणि ग्रामस्थांना समजल्यानंतर एकच संतापाची लाट पसरली आहे.

नेमकं काय घडलं?


भंडारा एसटी स्टँडहून मुंढरीसाठी बस क्रमांक एम.एच. 40 वाय 5008 रात्रीच्या वेळेत निघाली. या बसमधून मुंढरीसाठी दोन विद्यार्थीनींनी प्रवास करत होत्या. पण जेव्हा ही बस रोहा गावाला पोहोचली तेव्हा एक धक्कादायक घटना समोर आली. या दोन विद्यार्थींनींना अचानक बसमधून उतरण्यास सांगितलं. ही घटना घडली तेव्हा बरीच रात्र झाली होती. या दोघींना बस चालक आणि वाहक यांनी सांगितलं की, रोहाहून मुंढरीला जाणाऱ्या तुम्ही दोघीच आहेत. त्यामुळे तुम्ही इथेच उतरा ही बस आता मुंढरीला जाणार नाही. फक्त दोन प्रवाशांसाठी बस मुंढरीला जाणार नाही, असं कारण त्या बस चालकाने आणि वाहकाने दिलं.

हा संपूर्ण प्रकार विद्यार्थीनींनी जिल्हा परिषदचे शिक्षण आणि बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर यांना सांगितला. त्यांना घटनेची माहिती मिळताच नियोजित दौरा रद्द करून ते रोहा गावात पोहोचले. त्यानंतर त्यांनी एसटी चालक आणि वाहकला या कृत्याबद्दल जाब विचारला. एवढंच नाहीतर एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून या दोघांची तक्रार केली. शिवाय या दोघांवर कडक कारवाईची मागणी केली.

बसमध्ये एक प्रवाशी असो किंवा दहा प्रवासी बस नियोजित गावातून निघाल्यावर नियोजित स्थळी सुरक्षितरित्या पोहोचणे ही  एसटी प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या बस चालक आणि वाहक यांच्या बेजबाबदारपणा आणि कृत्यामुळे संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान रात्रीच्या अंधारात निर्जन ठिकाणी जर या दोन विद्यार्थीनींसोबत काही घडलं असतं तर, असा चिंतेतून पालक घाबरले आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES