SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कोण आहेत राजेश पाटील? अजित पवारांचे 'राईट हँड' ते फेटा न बांधण्याची घेतली भीष्मप्रतिज्ञा

2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 10, 2026, 15:21 IST | Updated: Nov 10, 2026, 16:15 IST
Image Credit: Gokul Dairy polls Rajesh Patil
Join

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली असून महायुत्तीची सत्ता आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. राजेश पाटील पहिल्यांदा चर्चे आले ते त्यांच्या त्या भीष्मप्रतिज्ञामुळे. जोपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री बनत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी घेतली होती. राजेश पाटील हे अजित पवारांचे 'राईट हँड' मानले जायचे. तर राजेश नरसिंगराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार असून कोल्हापूरच्या चंदगड मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केलंय. या विजयामुळे आता त्यांच्या खांद्यावर सहकार क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी पडली आहे. 

कोण आहेत राजेश पाटील?

2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील यांच्या भाजप बंडखोर शिवाजी पाटील यांनी पराभव केला होता. राजेश पाटील यांना राजकारणाचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे. राजेश पाटील यांचे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील हे चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. नरसिंग गुरुनाथ पाटील यांनी 1990 आणि 1999 मध्ये आमदार म्हणून काम केलं. त्यामुळे वडिलांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रभाव राजेश पाटील यांच्यावर लहानपणापासून पडला. वडिलांचा वारसा पुढे नेत त्यांनीही चंदगडच्या राजकारणात सक्रिय सहभाग घ्यायला सुरुवात केली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत त्यांनी विजय पटकावला होता. पण 2024 मध्ये अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील त्यांचा 24  हजार मतांच्या फरकाने पराभव केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार 
शिवेसनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे मेहुणे 
 2019 साली चंदगड विधानसभा मतदारसंघातून आमदार 
गेल्या गोकुळ निवडणुकीच्या वेळी राजेश पाटील यांच्या पत्नी आणि माजी खासदार संजय मंडलिक यांचं चिरंजीव वीरेंद्र मंडलिक यांचा पराभव
मागच्या वेळी गोकुळ निवडणुकीमध्ये झालेला पराभव मंडलिक आणि राजेश पाटील यांच्या जिव्हारी
हसन मुश्रीफ यांच्यावर मंडलिक गटाकडून टीकाही झाली होती.
दरम्यान हसन मुश्रीफ गटाकडूनच राजेश पाटील यांना गोकुळ अध्यक्ष पद मिळाल्याने राष्ट्रवादीचा अध्यक्ष गोकुळ संघाला मिळाला आहे
 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES