• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /महाराष्ट्रात खळबळ! माजी आमदाराच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न! सीसीटीव्हीत धक्कादायक घटना कैद, कोयता घेऊन...

महाराष्ट्रात खळबळ! माजी आमदाराच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न! सीसीटीव्हीत धक्कादायक घटना कैद, कोयता घेऊन...

अकोल्यात माजी आमदार नतीकोद्दीन खतीब यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. कोयता घेऊन आलेल्या अज्ञात व्यक्तीची दहशत सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 12, 2026, 06:05 PM IST|Updated: Oct 12, 2026, 06:06 PM IST
joinshare
महाराष्ट्रात खळबळ! माजी आमदाराच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न! सीसीटीव्हीत धक्कादायक घटना कैद, कोयता घेऊन...

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे माजी आमदार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते नतीकोद्दीन खतीब यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. धारदार हत्यार घेऊन आलेल्या अज्ञात व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. हातात कोयता घेऊन आलेल्या या व्यक्तीने शिवीगाळ करत खतीब यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हा संपूर्ण प्रकार घराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेमुळे बाळापूर शहरात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळापूर शहरातील माजी आमदार नतीकोद्दीन खतीब यांच्या घरावर एका अज्ञात व्यक्तीने धारदार कोयता घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित व्यक्तीने शिवीगाळ करत दहशत निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, हल्ला करण्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती नेमकी कोण आहे? याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती नतीकोद्दीन खतीब यांनी बाळापूर पोलिसांना दिली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. माजी आमदाराच्या घरावरच अशा प्रकारे हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी पोलिसांच्या तपासातून हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची ओळख कधी समोर येते आणि या घटनेमागील नेमके कारण काय, हे स्पष्ट होणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Akola