एकनाथ शिंदेंची शिवसेना फुटली! एकाचवेळी 1475 जणांनी शिवसेना सोडली; डायरेक्ट दुसऱ्या मोठ्या पक्षात जाहीर प्रवेश
एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसला आहे. हिंगोलीत एकाचवेळी 1 हजार 475 जणांनी शिवसेना पक्ष सोडला आहे.
एकनाथ शिंदे शिवसेना : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठी गळती लागली आहे. हिंगोलीत एकनाथ शिंदेंना जबरदस्त धक्का बसला आहे. शिवसेना तालुकाप्रमुख उदय बोराडे यांच्यासह 1 हजार 475 जणांनी भाजपात प्रवेश केला आहे. मंठा शहरात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांच्या एकाधिकार शाहीला कंटाळून शिवसेना सोडलेल्या मंठा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. भाजप आमदार बबनराव लोणीकरांच्या नेतृत्वाखाली या पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.शिवसेना तालुकाप्रमुख उदय बोराडे यांच्यासह 1 हजार 475 जणांनी यावेळी भाजपात प्रवेश केला.
मंठा शहरात हा प्रवेश सोहळा पार पडला.दरम्यान मंठा तालुक्यात आता शत प्रतिशत भाजपा झाली असून आता कोणतेही दुकान उघडणार नसल्याचं लोणीकरांनी म्हटल आहे. शिवाय मतदार संघातील शिंदेंच्या शिवसेनेचा सर्व पक्ष झाडून पुसून भाजपमध्ये आणल्याचं लोणीकरांनी म्हटल आहे. काही पक्षांची अवस्था जटायू सारखी झाली असून कुणाला कुठे जावं तेही कळत नसल्याचं लोणीकरांनी म्हटलय.दरम्यान या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदय बोराडे यांची भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती देखील याच कार्यक्रमात करण्यात आली.
मुंबईत शिंदेच्या पदाधिकाऱ्यांचा मनसेत प्रवेश
काही दिवसांपूर्वी शिवसेना( शिंदे गटात) प्रवेश केलेल्या विमानतळ परिसरातील अनेक कामगारांनी पुन्हा एकदा मनसेमध्ये प्रवेश केला. ओला-उबरचे चालक तसेच चालक आणि कामगारांनी मनसेमध्ये पुन्हा पक्षप्रवेश केला. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे विमानतळ परिसरात मनसेची ताकद पुन्हा वाढल्याचा दावा मनसे कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.