बुलढाण्याचा बिहार झाला; आमदार श्वेता महालेंचा आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा
चिखलीच्या आमदार श्वेता महाले आणि आमदार संजय गायकवाड यांच्यात चांगलीच जुंपली आहे. बुलढाण्याचा बिहार झाला असं विधान श्वेता महालेंनी केले. यापुढे बुलढाणा मतदारसंघात हुकूमशाही चालणार नाही असं म्हणत श्वेता महालेंचा संजय गायकवाडांवर निशाणा साधला.
बुलढाणा न्यूज : बुलढाण्यात दोन सत्ताधारी नेतेचे आमनेसामने आले आहेत. श्वेता महाले आणि संजय गायकवाड यांच्यात पुन्हा एकदा वाट पेटला आहे. श्वेता महाले यांनी बुलढाण्याचा बिहार उल्लेख केल्यानंतर संजय गायकवाड यांनी देखील श्वेता महाले यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच श्वेता महालेंच्या बुद्धीची किव येते असं म्हणत गायकवाडांनी महालेंवर टीकास्त्रही डागलं आहे.
भाजप आमदार श्वेता महाले आणि संजय गायकवाड यांच्यात पुन्हा एकदा जुंपली आहे.. श्वेता महाले यांनी बुलढाण्याला बिहार संबोधत गायकवाड यांना डिवचलं. बुलढाण्याचा बिहार झाला आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा बुलढाण्याला शांत करायचंय असं विधान श्वेता महाले यांनी केलंय.. यावर संजय गायकवाडांनी देखील पलटवार केला आहे. महालेंच्या बुद्धीची किव येते, माझ्या मतदारसंघात रात्री 11 वाजताही मुलगी एकटी फिरू शकते असं प्रत्युत्तर गायकवाडांनी दिले.
नेमका काय आहे वाद?
माझ्या मतदारसंघात कोणतीही मुलगी रात्री 12 वाजता एकटी फिरू शकते अशा शब्दांत आमदार संजय गायकवाड यांनी श्वेता महालेंवर पलटवार केला. चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी पुन्हा एकदा संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला. बुलढाण्याचा बिहार झाल्याचं विधान श्वेता महालेंनी केलं आहे.. तसंच यापुढे बुलढाण्यात हुकूमशाही चालणार नाही असं म्हणत त्यांनी संजय गायकवाड यांच्यावर थेट हल्लाबोल केला.
बुलढाण्यात महिलांना धमक्या दिल्या जातात. उचलून नेऊ, गायब करून टाकू असं म्हणत महाले यांनी अप्रत्यक्षरित्या गायकवाडांवर निशाणा साधला. दरम्यान महालेंच्या या आरोपांनाही संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. महिलांचं रक्षण करण्यासाठी माझं रक्त साडलंय. त्यामुळे बिनबुडाचे आरोप करू नये असं म्हणत गायकवाडांनी देखील श्वेता महाले यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
याआधी देखील संजय गायकवाडांनी केलेल्या एका वक्तव्यानं श्वेता महाले आक्रमक झाल्या होत्या.
बाप तो बाप रहेगा महालेंच्या या वक्तव्यानंतर संजय गायकवाडांनी त्यांचा उत्तर दिलं होतं, मात्र त्यांनी उच्चारलेल्या एका शब्दावर आक्षेप घेत महालेंनी त्यांची तक्रार थेट पोलिसात केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा हे दोन्ही नेते समोरासमोर आले आहेत.