• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /पोलिसांच्या गस्तीच्या वाहनातच गुन्हेगारांनी बनवली; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल

पोलिसांच्या गस्तीच्या वाहनातच गुन्हेगारांनी बनवली; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल

पोलिसांच्या गस्तीच्या वाहनातच गुन्हेगारांनी बनवली आहे. ही रील व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 03, 2026, 11:45 PM IST|Updated: Oct 09, 2026, 03:17 PM IST
joinshare
पोलिसांच्या गस्तीच्या वाहनातच गुन्हेगारांनी बनवली; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सवाल

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

छत्रपती संभाजीनगर : गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रात्रीची गस्त घालणाऱ्या मुकुंदवाडी पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच आता सवाल उपस्थित झाले आहेत. रामनगर, विठ्ठलनगर आणि संघर्षनगर परिसरात दहशत निर्माण करणारा प्रफुल्ल उर्फ लादेन याने चक्क पोलिसांच्या गस्तीवरील शासकीय वाहनात बसून रील तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

गणेशोत्सवादरम्यान रात्री विठ्ठलनगर चौकात तयार केलेला हा व्हिडिओ पोलिसांच्या वाहनासह सोशल मीडियावर टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एका गुन्हेगाराला पोलिसांच्या शासकीय वाहनात रील बनवण्याची संधी मिळतेच कशी, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, राजनगर, रेल्वेस्थानक परिसर, रामनगर, विठ्ठलनगर आणि जयभवानीनगर परिसरात मारहाण, वाहनांची तोडफोड आणि लुटमारीच्या घटना सातत्याने घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

प्रफुल्ल उर्फ लादेन याच्यावर चोरी, लुटमार, मारहाण आणि दहशत निर्माण करण्यासह विविध गुन्हे दाखल असल्याचे सांगितले जाते. प्रकाशनगर मैदान परिसरात तो साथीदारांसह नशा करून व्यापारी आणि भाजी विक्रेत्यांना त्रास देत असल्याची तक्रारही स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे मुकुंदवाडी पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर आणि गुन्हेगारी नियंत्रणाच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून मित्रावर कटरने हल्ला

छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या मित्रावरच कटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एमआयटी कॉलेजच्या मोकळ्या मैदानावर 30 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. या हल्ल्यात बी.टेक प्रथम वर्षात शिकणारा जिशांक जगदीश पाटील हा गंभीर जखमी झाला आहे. 

कॉलेजमधील मुला-मुलींच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आरोपी शिवम स्वामी याने मुलीचा फोटो टाकून अयोग्य वक्तव्य केल्याने त्याला ग्रुपमधून काढण्यात आलं होतं. याचाच राग मनात धरून शिवमने जिशांकला फोन करून ग्रुपमधून का काढलं, असा जाब विचारला. त्यानंतर आरोपीने जिशांकला एमआयटी कॉलेजच्या गेट क्रमांक पाचजवळ भेटायला बोलावलं. यावेळी शिवमने जिशांकला शिवीगाळ करत मारहाण केली आणि खिशातील कटर काढून त्याच्या मानेवर, डाव्या पायाच्या मांडीत आणि उजव्या गुडघ्यावर वार केले. या घटनेनंतर जिशांक गंभीर जखमी झाला असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Chhatrapati Sambhajinagar
crime
Maharashtra News