• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /संभाजीनगर हादरलं! मामेबहि‍णीशी बोलण्याचा राग, रात्री 11 वाजता दुचाकीवरून आला अन्...

संभाजीनगर हादरलं! मामेबहि‍णीशी बोलण्याचा राग, रात्री 11 वाजता दुचाकीवरून आला अन्...

छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. मामेबहि‍णीशी बोलतो म्हणून झालेल्या वादात एका तरुणाची हत्या झाली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 15, 2026, 05:24 PM IST|Updated: Oct 15, 2026, 05:54 PM IST
joinshare
संभाजीनगर हादरलं! मामेबहि‍णीशी बोलण्याचा राग, रात्री 11 वाजता दुचाकीवरून आला अन्...
Image Credit: chhatrapati sambhaji

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

भुगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

2

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

3

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

4

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

5

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका किरकोळ कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आली आहे.  मामेबहिणीशी बोलत असल्याच्या रागातून दोन तरुणांचा वाद झाला. त्यातून एकाची हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना गारखेडा परिसरातील साईनगर परिसरातील आहे. 14 ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे 11  वाजता या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. तौसिफ शमीम शेख असं मृत तरुणाचे नाव असून आदित्य शेळके या तरुणाने त्याची हत्या केली आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तौसिफ शमीम शेखच्या हत्येप्रकरणात त्याचा चुलत भाऊ मुजम्मील जमील शेख याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मुजम्मील जमील शेख याने पोलिसांना तक्रारीत सांगितलं की, तौसिफ शेख हा आई-वडिलांसह राहत होता. शिवाय कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी तोसेंट्रिंगचे काम करायचा. बुधवारी रात्री 10 वाजता जेवण झाल्यानंतर मी आणि तौसिफ नूर मस्जिदच्या पाठीमागे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी अचानक आदित्य शेळके तिथे आला. आदित्यने तौसिफला विचारलं तू माझ्या मामेबहिणीशी का बोलतो. यावरून दोघांमध्ये वाद झालेत. हा वाद अतिशय टोकाला जात होता, हे पाहून मी तौसिफला घरी जाण्यास सांगितलं. त्यावेळी आदित्यने तौसिफला जीवे मारण्याची धमकी दिली होती. 

त्यानंतर काही वेळानंतर मुजम्मील आपल्या घरी गेला आणि तौसिफ घरासमोरील मोटारसायकलवर बसून मोबाईल पाहत होता. त्यावेळी रात्रीचे 11 वाजले होते. आदित्य पुन्हा आला आणि यावेळी त्याच्या हातात चाकू होता. त्याने तौसिफच्या छातीवर चाकूने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामुळे तौसिफ बाइकवरून खाली कोसळला. आदित्यने तौसिफच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर चाकूने वार केले होते, असं त्याने पोलिसांना सांगितलं. 

हा हल्ला पाहून मी आणि इतर स्थानिक लोक तौसिफच्या मदतीला धावलो. पण तोपर्यंत आदित्य घटनास्थळावरून पळून गेला होता. या हल्ल्यात तौसिफ गंभीर जखमी झाला होता. त्याला बाईकवरून तातडीने एमजीएम रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तपास करता क्षणी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान पोलीस आदित्यचा शोध घेत आहे. तर पोलिसांच्या तक्रारीत तौसिफच्या छातीसह नाक आणि डोक्यावर जखमा झाल्याचे नमूद करण्यात आलंय. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime
Chhatrapati Sambhajinagar