तंबाखूच्या नादात तरुणाने अख्खा ब्रश गिळला, तब्बल 12 तास टूथब्रश पोटातच राहिला, अखेर...
कुणाच्या पोटात सेफ्टी पिन तर कुणाच्या पोटात शिक्के गिळल्याचे तुम्ही एकले असेलच. पण कोणी टुथब्रश गिळल्याचे तुम्ही ऐकलंय का?
ऐकावे ते नवलच असा काहीसा प्रकार छत्रपती संभाजीनगर मध्ये पुढे आला आहे. एका व्यक्तीने ब्रश करताना थेट टूथ ब्रश गिळल्याचे समोर आले आहे. ब्रश करताना त्याला ठसका आला आणि चुकून हा ब्रश घशातून थेट पोटातच गेला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. आता रुग्ण ठणठणीत आहे. मात्र अत्यंत दुर्मिळ अशी ही घटना छत्रपती संभाजी नगर मध्ये उघडकीस आली आहे. पाहुयात काय आहे हा प्रकार?
रोज सकाळी दात स्वच्छ करण्यासाठी हातात असणारा ब्रश थेट कधी पोटातही जाईल याची कोणीच कल्पना करु शकत नाही. पण संभाजीनगरमध्ये अशी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुणाला तंबाखू खाण्याचे व्यसन होते. त्यामुळं त्याचे दात खराब झाले होते. डॉक्टरांनी मागचे दात स्वच्छ ठेवण्यास सांगितले होते.
तरुण दात घासत असताना त्याला जोराचा ठसका लागला आणि ब्रश थेट त्याच्या घशात गेला. इतकंच नव्हे तर घशातून ब्रश त्याच्या पोटात गेला. ब्रश पोटात गेल्यावर रुग्ण घाबरला. आता पोटातून ब्रश कसा काढायचा हे ही कळेना. अखेर रात्री गावातून तो शहरात पोहोचला आणि रुग्णालयात दाखल झाला.
पोट विकार तज्ज्ञ डॉ चेतन राठी यांनी शर्थीचे प्रयत्न करत इंडोस्कोपी करत अवघ्या 10 मिनिटांत ब्रश ओढून बाहेर काढला. इथे नशीब बलवत्तर म्हणून तरुणाचा जीव वाचला आहे. तर डॉक्टरांनीही काळजी घेण्याचे अवाहन केलं आहे.
ब्रश पोटात जाऊ शकतो असं कधीही वाटू शकतं नाही मात्र संभाजीनगर मध्ये हे घडलंय. ही घटना दुर्मिळ आहे यातून रुग्णाचा जीवही जाऊ शकला असता मात्र चूक लक्षात आली योग्य उपचार मिळाले आणि अखेर रुग्णाचा जीव वाचला त्यामुळं सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.