• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /मंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावरील हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट, हल्लेखोरांची माहिती समोर, एकाच कनेक्शन थेट परदेशात

मंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावरील हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट, हल्लेखोरांची माहिती समोर, एकाच कनेक्शन थेट परदेशात

शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. हल्लेखोरांबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 14, 2026, 01:04 PM IST|Updated: Nov 14, 2026, 01:08 PM IST
joinshare
मंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावरील हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट, हल्लेखोरांची माहिती समोर, एकाच कनेक्शन थेट परदेशात
Image Credit: Sanjay Shirsat

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप? ऑपरेशन टायगर 3.0

2

पंढरपूरमध्ये NDRF ची टीम दाखल; 50 फूट खोल विहिरीत कामगार अडकले; एकाचा मृत्यू

3

भारताच्या हवामानात डेंजर बदल, 12 राज्यांना पावसाचा अलर्ट; 145 स्पीडने वारे वाहणार, मोठं वादळ धडकणार, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?

4

NVIDIA चे CEO जेन्सन हुआंग यांच्या चिनी गर्लफ्रेंडबाबत आजपर्यंतचा सर्वात मोठा खुलासा; 2025 मध्येच सिंगापूरच्या कंपनीतून...

5

ICC ची मोठी घोषणा; भारतामध्ये होणार 'या' जागतिक मोठ्या स्पर्धा! वेळापत्रक जाहीर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

शिवसेना नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर गुरुवारी रात्री उशिरा हल्ल्याचा प्रयत्न झाला. तीन अज्ञात हल्लेखोऱ्यांनी त्यांच्या घरावर हल्ला केला होता. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यासोबत ज्यावेळी हल्लेखोऱ्यांनी संजय शिरसाट यांच्या घरावर हल्ला केला, ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा हल्ला त्यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या घराबाहेर करण्यात आला होता. आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

चौकशीतून धक्कादायक माहिती समोर!

पोलिसांनी या प्रकरणातील हल्लेखोऱ्यांची माहिती देताना सांगितलं की, अटकेत असलेले तिन्ही आरोपी उच्चशिक्षित आहे. त्यातील एक तरुण हा परदेशात नोकरी करतो. रोहित भूताळ असं त्याचं नाव असून तो जर्मनीमधील एका खासगी कंपनीत कामाला होता. दुसऱ्या तरुणाचे नाव शिवम गायकवाड आणि प्रतीक कुटे असं आहे. शिवम हा एम. एस्सी तर प्रतीकने बी. फार्म पदवी घेतली होती. हे तिघे दिवाळीसाठी एकत्र भेटले होते. पोलिसांनी तपास असं समोर आलं की, हे तिघ शहरातील एन 1 आणि त्यानंतर उल्कानगरीत दारू पार्टी केली. दारू पार्टी करताना त्यांच्याजवळील दारू संपली. त्या तिघांना अजून दारू हवी होती, म्हणून ते गोलवाडी फाट्यावरील बारवर गेले. हे बार त्याच ठिकाणी आहे, जिथे शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांचं घर आहे.

हल्ल्यामागील कारण आलं समोर

पुढे पोलिसांनी सांगितलं की, बारमधून बाहेर पडल्यानंतर सर्व्हिस रोडवर त्यांची दुचाकी घसरली. त्यानंतर असं समोर आलं की, या परिसरात दोन ते तीन वेळा चकरा मारत होते. त्यामुळे शिरसाट यांच्या घराबाहेर असलेल्या सुरक्षारक्षकांनी त्यांची चौकशी केली. ते दारू प्यायले होते, त्यामुळे सुरक्षारक्षांसोबत त्यांचे वाद झाला, अशी माहिती पोलिसांना त्यांनी चौकशी दरम्यान दिली. त्यामुळे तरुण आणि सुरक्षारक्षकांमधील वादातून हा हल्ला झाला असं चौकशीदरम्यान प्रथमदर्शनी समोर आलं आहे. तरीही पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
shiv sena
Sanjay Shirsat
crime