• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /दोघांच्या पायाला लोखंडी साखळी अन् कुलूप, लव्ह मॅरेज केलेल्या जोडप्याचा अंत, नेमकं घडलं काय?

दोघांच्या पायाला लोखंडी साखळी अन् कुलूप, लव्ह मॅरेज केलेल्या जोडप्याचा अंत, नेमकं घडलं काय?

एकमेकांच्या पायाला लोखंडी साखळी बांधून एका दाप्त्याने तापी नदीत आत्महत्या केली आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावरुन उडी घेतली.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 09, 2026, 01:44 PM IST|Updated: Oct 09, 2026, 03:20 PM IST
joinshare
दोघांच्या पायाला लोखंडी साखळी अन् कुलूप, लव्ह मॅरेज केलेल्या जोडप्याचा अंत, नेमकं घडलं काय?
Image Credit: dhule couple suicide news

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावातील दाम्पत्याने तापी नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे एकमेकांच्या पायाला लोखंडी साखळी बांधून त्यांनी हे पाऊल उचलले. त्या मुळं या दाम्पत्याने आत्महत्या केली की काही घातपात आहे, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील सावळदे तापी पुलावरुन प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याने तापीत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे तापीत मृतदेह आढळून आला तेव्हा पती आणि पत्नी दोघांच्या पायाला लोखंडी साखळी बांधल्याचे आढळून आले आहे. इतकेच नाही तर ही साखळी कुलूप लावून घट्ट करण्यात आली होती.

शाम हरी पाटील वय 35 आणि नासीमा मुल्ला ऊर्फ सपना शाम पाटील असे मृत दाम्पत्याचे नाव असून ते जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील पाडळसे येथील आहेत. काही महिन्यांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर दोघांचे मृतदेह नरडाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नरडाणा पोलीसांकडून या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे. आत्महत्येच नेमकं कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही

समोर आलेल्या माहितीनुसार, श्याम पाटील काही वर्षांपूर्वी पाडळसरे गाव सोडून कामानिमित्त उतराण येथे गेले होते. तेथे शेती आणि ट्रॅक्टर चालवण्याचे काम करत असताना त्यांची सपना यांच्याशी ओळख झाली. पुढे या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले आणि दोघांनी प्रेमविवाह केला होता.

घटनेच्या काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य बाहेरगावी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अचानक दोघांचे मृतदेह तापी नदीत आढळल्याने कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या

आधी पत्नीचा व्हिडिओ बनवला नंतर पत्नीची दगडाने ठेचून हत्या केली. धाराशिव जिल्ह्यातील हासेगाव परिसरात ही भयंकर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, चार वर्षांच्या चिमुकल्यासमोर त्याच्या आईची हत्या करण्यात आली. तर, घटनास्थळावरुन आरोपी गणेश टेकाळे फरार असून कळंब पोलिसांकडून शोध सुरू आहे. धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे. कळंब-येरमाळा मार्गावरील हासेगाव परिसरात ही घटना घडली. विशेष म्हणजे, हत्येपूर्वी आरोपीने पत्नीचा व्हिडिओ चित्रीत करून तो नातेवाईकांना पाठवल्याची माहिती समोर आली आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Dhule
Maharashtra News
crime