• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /ललिता तारख मराठा आंदोलकांच्या रडारवर; ट्रोलिंगमुळे हतबल! फडणवीसांची भेट घेत करणार मागणी

ललिता तारख मराठा आंदोलकांच्या रडारवर; ट्रोलिंगमुळे हतबल! फडणवीसांची भेट घेत करणार मागणी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवालीतील आंदोलनात काम केलेल्या पण आता जरांगे पाटलांवर केलेल्या टिकेमुळे ललिता तारख मराठा आंदोलकांच्या रडारवर आल्या आहेत.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 01, 2026, 01:52 PM IST|Updated: Oct 09, 2026, 03:15 PM IST
joinshare
ललिता तारख मराठा आंदोलकांच्या रडारवर; ट्रोलिंगमुळे हतबल! फडणवीसांची भेट घेत करणार मागणी

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नितेश महाजन, जालना

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवालीतील आंदोलनात काम केलेल्या पण आता जरांगे पाटलांवर केलेल्या टिकेमुळे ललिता तारख मराठा आंदोलकांच्या रडारवर आल्या आहेत. पोलिसांत तक्रार देऊनही ठोस कारवाई होत नसल्याने हतबल झालेल्या ललिता तारख यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार असल्याचा इशारा जरांगे समर्थकांना दिला आहे.


मनोज जरांगे पाटलांनी तब्बल तीन वर्षे अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलनं केली. या आंदोलनात सुरुवातीच्या काळात अंतर वाली गावातीलच ललिता तारख यांनी महत्वाचं योगदान राहिलं. पण मनोज जरांगे पाटलांनी यापुढे अंतरवालीत आंदोलनं करणार नसल्याची घोषणा केली. त्याचबरोबर अंतरवालीतील उपोषण स्थळावरील मंडप आणि स्टेज हटवण्याच्या सूचना गावातील मराठा आंदोलकांना दिल्या. जरांगे पाटलांची सूचना पाळत गावकऱ्यांनी उपोषण स्थळावरून मंडप आणि स्टेज हटवलं. यानंतर ललिता तारख यांनी आंदोलनातून काहीही साध्य झालं नसल्याचा आरोप करत ललिता तारख यांनी हैद्राबाद गॅझेटीयर लागू होऊनही गावात एकही कुणबी जात प्रमाणपत्र निघालं नसल्याच सांगत जरांगे पाटलांवर आगपाखड केली. तसेच अंतरवालीत मनोज जरांगे पाटलांनी उपोषणं कशी केली हे वेळ आल्यावर सांगणार असल्याचा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून दिली

ललिता तारख यांनी जरांगे पाटलांवर आगपाखड करतानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि मराठा आंदोलकांना टीका करायला आयतं कोलीत मिळालं. त्यांच्या व्हिडीओवर अश्लील टिका टिप्पणी करण्यात येऊ लागली. शिवीगाळ झाली, धमक्यांचे फोनही आले. तसेच सोशल मीडियावर त्यांचे AI निर्मित फोटो व्हिडिओ तयार करून टाकण्यात आले. त्यामुळे ललिता तारख यांनी अंबड पोलीस ठाणे गाठत ट्रोलिंग करणाऱ्यांविरोधात तक्रार करत कारवाईची मागणी केली. त्यासाठी त्यांनी पोलिसांत रितसर लेखी तक्रारही केली. पण कारवाई होत नसल्यानं ललिता तारख हतबल झाल्या आहेत. या बदनामीमागे जरांगे पाटलांची सोशल मीडिया टीम असल्याचा आरोप ललिता तारखांनी केला आहे. जर या प्रकरणात कारवाई झाली नाही तर थेट गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आरोपींवर कारवाईची मागणी करणार असल्याचा इशारा ललिता तारख यांनी दिलाय


दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना दोन दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी सर्वात आधी अंतरवाली सराटी गावात जाऊन ललिता तारख यांच्या टिकेवरून गरम झालेलं वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.अंतरवालीत आजपर्यंत झालेल्या आंदोलनात सर्वांचंच योगदान असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळे सगळे आपलेच असून कुणालाही काहीही बोलू नका.कुणी बोललं तरीही एका मिनिटांत डोक्यातील राग काढून टाका असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलं.

मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना ललिता तारख यांच्या टिकेवरून शांत राहण्याचं आवाहन करून देखील मराठा आंदोलकांकडून आजही ललिता तारख टिकेच्या धनी ठरतायत. व्हिडीओवर येणाऱ्या अश्लील कमेंटमुळे ललिता तारख हतबल झाल्या आहेत. ललिता तारख यांनी भलेही जरांगे पाटलांवर टिकेची तोफ डागली असली तरी आजही त्यांच्या मनात मनोज जरांगें पाटलांबाबत असलेली सहानुभूती कायम आहे आणि त्यामुळेच ललिता तारख यांच्या घरातील भिंतीवर मनोज जरांगे पाटलांचा हा फोटो मोठ्या दिमाखात लावलेला पाहायला मिळतो. आपण भलेही जरांगे पाटलांवर टिका केली असली तरीही मरेपर्यंत जरांगेंचा फोटो आपल्या घरात असेल असा विश्वास ललिता तारख यांनी व्यक्त केला आहे.

मनोज जरांगे पाटलांनी अंतरवालीतील उपोषण स्थळावरचा मंडप आणि स्टेज हटवण्याच्या सूचना केल्यानंतर ललिता तारखांनी जरांगे पाटलांना लक्ष केलं.आणि तेव्हापासून सुरू झालेलं ललिता तारख यांच्यावरील ट्रोलिंग थांबायचं नाव घेत नाही आहे. मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर तरी हे ट्रोलिंग थांबेल अशी अपेक्षा होती. मात्र यातही दोषींवर पोलीस कारवाई होत नसल्यानं ललिता तारख यांनी गृहमंत्र्यांकडे जाऊन कारवाईची मागणी करणार असल्याचा इशारा दिला.त्यामुळे आता ललिता तारख यापुढे काय पाऊल उचलतात हे पाहावं लागेल
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Manoj Jarange-Patil