SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'तुलाच एकनाथ शिंदेंना संपवायचं आहे', मनोज जरांगे पाटालांचा रामदास कदमांवर गंभीर आरोप, 'मला करायचं असतं शिंदेंची बरंच काही उघड...'

रामदास कदम यांच्या गंभीर आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी लगचेच सडेतोड उत्तर दिलं आहे. तू यात पडू नको असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी रामदास कदम यांना थेट इशाराही दिला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 23, 2026, 03:03 PM IST | Updated: Oct 23, 2026, 03:13 PM IST
Image Credit: manoj jarange allegations on ramdas kadam
Join

मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिप बॉम्बमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहेत. रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला लक्ष्य केलं आहे. तर मैत्रीच्या आडून मनोज जरांगे हे एकनाथ शिंदेंना संपण्याचा कट रचत आहे, असा गंभीर आरोप केला आहे. एवढंच नाहीतर ज्यादिवशी तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या मूळावर उठण्याचा प्रयत्न केला त्यादिवशी मराठा समाज तुमच्या मूळावर आल्याशिवाय राहणार नाही. तुमचे खरे रूप लोकांसमोर आले आहे. या आरोपांनंतर मनोज जरांगे पाटील यांनी रामदास कदम यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.

रामदास कदमांना क्लिपची तारीख कशी माहीत?

पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटील रामदास कदम यांना म्हणाले की, या ऑडिओ क्लिपची शिंदे साहेब आणि पोलीस यंत्रणा तपास करतील. तुम्हाला एवढंच सांगतो तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही माझ्या डोक्याला डोकं लावू नका. तुम्हाला तारीख कशी माहिती झाली ते तुम्ही पोलिसांना, शिंदे साहेब आणि फडणवीसांना सांगा. हे खूप मोठं गौडबंगाल असून हे कोड आहे. धमक्या देण्याचं काम बंद करायचं. मी आदर करतोय हे शेवटचं. माझ्याबद्दल याच्यानंतर कसंच बोलायचं नाही. डोक्याच्या वर जायचं नाही. हीच तर पोट दुखी आहे. 

नोकर आहे का मी तुमच्या?

भाजपवाले म्हणतात ते तुमचे मित्र आहेत. यांच्यासोबत बोलो तर हे बोलतात. नोकर आहे का तुमचा मी. रामदास कदम यांचं ऐकायला नोकर आहे का मी. याचं वेगळं गराहण आहे. ३२ मिनिटांची क्लिप असू दे २०० मिनिटांची क्लिप असू दे काही अडचण नाही आम्हाला. आपलं जे असतं ते खरं असं ओपन आहोत आम्ही. तुम्ही त्याची काळजी करू नका. 

रामदास कदमांनी शिंदेंना संपवू नये - मनोज जरांगे

तुम्ही वयाने मोठे आहात मी तुमचा आदर करतो, तुम्ही आणि तुमच्या पोराने नीट बोलायचं. आम्हाला जर शिंदे साहेबांना संपवायचं असतं तर आम्ही हे काढलं नसतं.  तू संपवू नकोस. तू यात पडू नकोस आणि त्यांना संपवूनही नको. गद्दारचं नाव सांगावं रामदास कदम यांनी.  

शिंदेचं एवढं आहे मग...

ते पुढे म्हणाले की, तारीख तर आम्हाला माहितीच नाही. काय फुटाफुटी आहे, काय आहे, की तू आहेस, ते दरेकर समिती आहे दोघं जण. त्यांना माहितीये छक्के पंजे कोणते आहेत ते. हे सगळं बाहेर येऊ दे जरा. तुला जर असं चिल्लर काम करायचं आहे, बाटल कसली आहे, हे कसलं आहे. शिंदेचं एवढं आहे मग..., बस तू आता मला बोलायचं नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES