• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /छत्रपती संभाजीनगर
  • /'महाराष्ट्रातून 100% भाजप संपणार'; मनोज जरांगेंचा मोठं वक्तव्य, थेट पंतप्रधानांकडे…

'महाराष्ट्रातून 100% भाजप संपणार'; मनोज जरांगेंचा मोठं वक्तव्य, थेट पंतप्रधानांकडे…

ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्रात राजकारण पेटलं असताना मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत मोठं वक्तव्य केलं आहे.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 24, 2026, 02:57 PM IST|Updated: Oct 24, 2026, 03:11 PM IST
joinshare
'महाराष्ट्रातून 100% भाजप संपणार'; मनोज जरांगेंचा मोठं वक्तव्य, थेट पंतप्रधानांकडे…
Image Credit: manoj jaranges on cm

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप ऐकून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप केला. या ऑडिओ क्लिपचा संबंध खासदार श्रीकांत शिंदेंशी असल्याने महाराष्ट्रातील राजकारणात नेते मंडळी एकमेकांवर आरोप करत सुटले आहेत. तर मुख्यमंत्र्‍यांनी एसआयटी चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे. ही ऑडिओ क्लिप खरी आहे की खोटी, कोणी समोर आणली, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशातच मनोज जरांगे पाटीलही काही शांत बसत नाहीय. रोज पत्रकार परिषद घेऊन ते मोठे मोठे दावे करत आहेत. शनिवारी त्यांनी महाराष्ट्रातून भाजप संपू शकतो, असा दावा केला आहे.

मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणालेत?

मनोज जरांगे पाटील म्हणालेत की, माझ्या मुद्दा एवढाच आहे की, मला 500 कोटी देऊन मराठा आंदोलन संपवण्याचा घाट का घातला. गेल्या तीन वर्षांपासून हे आंदोलन संपलं पाहिजे म्हणून मोठं मोठं संकट उभं का करत आहेत, याचे उत्तर जाणून घेणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. तुम्ही जर ती ऑडिओ क्लिप ऐकली ना इतकी भयानक कट रचला आहे ना. तोंडावर गोड बोलायचं आणि पाठीमागे मोठं षडयंत्र हे फारच भयानक आहे. कधी बाहेर न येणारे षडयंत्र आपण बाहेर काढलं आहे. मी याच्या मूळाशी जाणार आहे. एकनाथ शिंदेंनी पण या प्रकरणाच्या मूळाशी गेलं पाहिजे. जरी ती आपली माणसं असली तरी सोडले नाही पाहिजे. 

ते पुढे म्हणालेत की, हा विषय गंभीर असून यात पंतप्रधान मोदींनी लक्ष घालावं. नाही तर भाजप शंभर टक्के महाराष्ट्रात संपुष्टात येऊ शकतो. फडणवीस आणि मोदींच्या परस्पर पडद्यामागे हे सुरू असेल तर भयंकर आहे. ही विचारधारा देशाला परवडणारी नाही. सर्व नेत्यांना समजलं आहे, हे नेटवर्क किती मोठं आहे. त्यामुळे नेत्यांनी पुढे येत नाव घ्यायला सुरु केली आहे. कारण या नेत्यांना धक्का बसला आहे. आता नेते मंडळांच्या दिल्लीच्या वाऱ्या सुरू होऊ शकतात आणि आमच्याच विरोधात, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने सावध राहावं. शिंदे साहेबांच्या लोकांकडून लोक फोडणं सुरु आहे. बायांचे आरोप करायचे, कुठे पैशाचे आरोप करायचे, जमेल ते आरोप करुन बदनाम करायचं. 

फडणवीस यांच्याबद्दल बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणालेत, फडणवीस साहेबांकडूनही मराठा आंदोलनात फोडीचं राजकारण चालू आहे. जर फडणवीस साहेबांच्या लोकांना वाटत असेल की फडणवीस साहेब असं करू शकत नाही, तर पुराव्यासहीत दाखवून देतो. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Manoj Jarange-Patil
Devendra Fadnavis
Maharashtra Politics